ताज्या घडामोडी

मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी सिन्नरकर सज्ज, शिर्डी सिन्नर मार्गावर ठिकठिकाणी होणार स्वागत 


मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी सिन्नरकर सज्ज,

 

शिर्डी सिन्नर मार्गावर ठिकठिकाणी होणार स्वागत 

 

सिन्नर प्रतिनिधी 

 

मराठा शांतता रॅलीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे नाशिकमध्ये येत असून त्यांच्या मार्गांवर सिन्नर तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी सिन्नरकर सज्ज झाले असल्याची माहिती मराठा आरक्षण समितीचे राज्य समन्वयक विलास पांगारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

सकाळी ७ ला वाहनांचा ताफा असलेली शांतता रॅली शिर्डी

Advertisement

येथुन निघणार आहे.स.७.३० ला पाथरे.८ ला वावी त्यानंतर मिठसागरे मार्गे पंचाळे येथील हरीणाम सप्ताह्याला भेट देऊन रामगिरी महाराजांचे आशिर्वाद घेणार आहे.त्यानंतर पांगरी येथेही ग्रामस्थांच्या वतीने जरांगे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.देवपुर फाटा मुसळगाव मार्गे सकाळी १० ला सिन्नर शहरात आगमन होणार असुन, बसस्थानकावर रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे.

 

तालुक्यातील पुर्व भागातील वीस गावातुन ५०० गाड्यांचा ताफा सहभागी होणार असुन मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण मिळण्यासाठी राजकीय जोडे बाजुला सारुन हजारो कार्यकर्ते रॅलीत चारचाकी व दुचाकी वाहने घेऊन स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेला अॅड.संजय सोनवणे,नामदेव कोतवाल, कृऊबाचे सभापती शशिकांत गाडे,अण्णासाहेब खाडे, संजय चव्हाणके, म्हाळु रानडे, पांडुरंग वारूंगसे,शाम कासार, राजेंद्र मुरूकुटे, हरीभाऊ तांबे, रामदास खैरनार, चैतन्य देशमुख, ऊत्तम करडक, सोपान सोनवणे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *