स्वातंत्र्य सैनिकांची नावे शहरातील रस्त्यांना द्या : सिन्नर राष्ट्रवादीचे नगरपालिकेला निवेदन
स्वातंत्र्य सैनिकांची नावे शहरातील रस्त्यांना द्या :
सिन्नर राष्ट्रवादीचे नगरपालिकेला निवेदन
सिन्नर प्रतिनिधी
स्वातंत्र्यासाठी अपुर्व योगदान दिलेल्या, शहरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे, शहरातील रस्त्यांना देण्यात यावी.
अशा आशयाचे निवेदन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेचे सहाय्यक मुख्याधिकारी बंगाळ यांना देण्यात आले .
तालुकाध्यक्ष अॉड.संजय सोनवणे,माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल,ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्य सैनिकांचे वारस सुभाष जाजु यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ऐहिक सुखाच्या त्याग करून,
ब्रिटीश सत्तेविरूध्द रणशिंग फुंकुन,स्वातंत्र्याचा रणसंग्रामात सिन्नरच्या सुपुत्रांनी कारावास भोगला.यामध्ये स्व.केशरचंद जाजु,शंकरलाल कपुर,अनंत दुर्वे,बाबुराव काकड, हरीभाऊ बेदरकर,कृष्णाजी लोणारे,नारायण ग़ोळेसर, जगन्नाथ देशपांडे, मनोहरसा क्षत्रिय, विठ्ठल काळे आदींसह इतर स्वातंत्र्य सैनिक आहेt.
यापूर्वी देखील नगर पालिकेवर लोकनियुक्त कार्यकारीणी असतांना शहरवासीयांनी रस्ते व अनामिक चौकांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे देऊन, त्यांचा इतिहास पुढच्या पिढीला ज्ञात व्हावा.यादृष्टीने वारंवार मागणी व पाठपुरावा केलेला आहे.तथापी टक्केवारीने ग्रासलेल्या नगर पालिकेतील लोकनियुक्त सदस्यांनी याबाबत गांभीर्याने विचार केला नाही..असा आरोपही निवेदनात केला आहे.
तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी, याबाबत लक्ष घालून शहरातील प्रमुख रस्त्यांसह,इतर रस्त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे देणेबाबत कार्यवाही करावी.अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.दत्ता गोळेसर,लक्ष्मीकांत मैंद, हेमंत देवनपल्ली,माणिकराव भंडारी, डॉ विष्णु अत्रे,महिला तालुकाध्यक्षा डॉ प्रतिभा गारे, शहराध्यक्षा मंगला गोसावी, दिलीप कु-हे,काळुराम देडे,,योगेश काकड आदी उपस्थित होते.