जनसेवा सेवाभावी संस्था तर्फे होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप
जनसेवा सेवाभावी संस्था तर्फे होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप
ठाणगाव प्रतिनिधी
समाजाप्रती असलेल्या एक नैतिक जबाबदारी स्वीकारून ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्यात आले. यासोबत दहावी व अकरावी मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींना सायन्स व कॉमर्स पुस्तके यांचा पूर्ण सेट आणि वह्या देण्यात आल्या. डॉ भाऊसाहेब शिंदे यांच्या आर्थिक मदतीतून व जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर यांच्या पुढाकाराने उपक्रम राबविला गेला. यावेळी डॉ. शिंदे आणि भोर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जनसेवा सेवाभावी संस्था नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपले यश संपादन करावे आपल्या गावाची व विद्यालयाची आपल्या परिसराचे नाव उज्वल करावे. यासाठी होतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना जनसेवेच्या माध्यमातून वेळोवेळी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक देताना, डॉ भाऊसाहेब शिंदे, जनसेवेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर, सुनील गोसावी , जनसेवा सेवाभावी संस्थेच्या सदस्य, सागर भोर जनसेवा संस्थेच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते.