संविधान समता दिंडीचे १ जुलै रोजी पुण्याहून दिमाखात प्रस्थान
संविधान समता दिंडीचे १ जुलै रोजी पुण्याहून दिमाखात प्रस्थान
पुणे प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या आहेत. या वारीमध्ये खास समतेची दींडीदेखील संत तुकोबांच्या वारीमध्ये सहभागी झाली आहे. संविधान ज्याची सुरुवात आपण भारताचे लोक म्हणजे इथला प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्तीला धरून आहे, ते संविधान या वारकरी परंपरेतून, या वारकरी दिंडीतून सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, याच उद्देशाने संविधान समता दिंडी महाराष्ट्रभर दरवर्षी काढली जाते.
संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक म्हणून आहे. भारतात इथला प्रत्येक नागरिक एकमेकांना जोडलेला आहे. या देशाचे संविधान बनलं तर संविधानावर या देशातील विविध संस्कृतींचा प्रभाव देखील आहे. संविधानात असणारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य संविधानात प्रत्यक्षपणे न येता त्याचा एक संबंध या भारतीय संस्कृतीशी देखील आहे, या संत परंपरांमध्ये आहे.
यावर्षी संविधान समता दिंडीचा
प्रस्थान सोहळा समताभूमी, महात्मा फुले वाडा, गंजपेठ, पुणे
सोमवार, १ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडला.
*विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |*
*भेदाभेदभ्रम अमंगळ ||*
Advertisement
हा भाव मनी ठेवून लाखो वारकरी पंढरीकडे वाटचाल करीत आहेत. संतांनी सामाजिक समतेचा झेंडा पंढरपूरच्या वाळवंटात रोवला आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात विद्रोह केला. ‘वारी’ हा त्यामुळेच महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि तसा खरा अध्यात्मिक सोहळा ठरला आहे. आपण सर्व ह्या उदारमतवादी परंपरेचा वारसा जपूया ! या
संविधानातील मूल्ये आणि संतविचार हे परस्पराला पूरक आहे. हा विचार या पालखी सोहळ्यातून समजून घेण्यासाठी, या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
*’संविधान समता दिंडी’* पुण्यातून १ जुलैपासून पंढरपूरला १७ जुलैपर्यंत असणार आहे. संविधान समता दिंडीचे यंदाचे हे ६ वे वर्ष आहे. या दिंडीच्या प्रस्थान सोहळा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समता बंधू उपस्थित होते.
दिंडीचे अध्यक्ष मा.उल्हासदादा पवार
माजी आमदार, संत साहित्याचे अभ्यासक तर प्रमुख पाहुणे
ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे
परिवर्तनवादी कीर्तनकार
मा. गजानन खातू, जेष्ठ समाजवादी नेते
ह.भ.प. सचिन महाराज पवार
संपादक- वारकरी दर्पण हे आहेत. या दिंडीत अविनाश पाटील, ॲड. वर्षा देशपांडे
सुभाष वारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिंडी चालक – ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर आहेत.
यासोबतच सोहळ्याचे संयोजक
ह. भ. प. सोमनाथ महाराज पाटील, ह. भ. प. समाधान महाराज देशमुख, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर,
ह. भ. प. हरिदास महाराज तम्मेवार यांनी सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत .