दापुरच्या प्रदिप आव्हाडची शिक्षण विभागात गरुडझेप
दापुरच्या प्रदिप आव्हाडची शिक्षण विभागात गरुडझेप
दापुर ग्रामस्थांकडून प्रदिपचा सत्कार
सिन्नर प्रतिनिधी : दापुर गावचे भुमिपुत्र, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बाळासाहेब आबाजी आव्हाड यांचे चिरंजीव प्रदिप बाळासाहेब आव्हाड यांची रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल दापुर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रदिप आव्हाड याचा सन्मान करण्यात आला. आतापर्यंत प्रदिपने अत्यंत मेहनत घेऊन जिद्द आणि चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.यावेळी प्रदीपने पुढे जाऊन यु.पी.एस.सी,एम.पी.एस.सी सारख्या स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणार असुन भविष्यात मोठं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखीन मेहनत घेणार आहे , असे मनोगत व्यक्त केले. मेहनतीच्या काळात आई, वडील यांची मोलाची साथ मिळाल्याचे प्रदिपने सत्काराला उत्तर देताना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड, निवृत्ती कारभारी आव्हाड, विकास सोसायटीचे संचालक देवराम आव्हाड, विश्वनाथ आव्हाड, संपत आव्हाड, लक्ष्मण आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, सुनील निरगुडे, भास्करराव बेलगाये, चहादु आव्हाड , सुभाष मतलबे, शंकर घुले, मारूती बेदाडे, संतोष मतलुबे, सुभाष गारे, कचु बेलगाये, रोहन आव्हाड आदीं सह ग्रामस्थ उपस्थित होते.