सामाजिक बांधिलकी सोबत निष्ठेचे फळ
भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मुकुंद काकड
सामाजिक बांधिलकी सोबत निष्ठेचे फळ
सिन्नर प्रतिनिधी
नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी, मुकुंद काकड यांची निवड करण्यात आली असून
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय
चौधरी यांच्या हस्ते फुल गुच्छ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव , यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र इंजिनिअर मुकुंद काकड सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पार्टीचे काम एकनिष्ठपणे करत आहेत. गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनवीन उपक्रम राबवत असतात. गोरगरिबांना विद्यार्थ्यांना व आदिवासी लोकांसाठी जनहिताच्या योजना राबवत आहे.
भारतीय जनता पार्टी सर्व सिन्नर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या एक विचारांनी मुकुंद काकड यांना पद द्यायला हवे.अशी भावना लक्षात घेऊन जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मुकुंद काकड यांना हे पद देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, सिन्नर तालुका प्रभारी जयंतराव आव्हाड, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे पाटील ,माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष बहिरू दळवी, पूर्व तालुकाध्यक्ष प्रकाश दबंग, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब हांडे, तालुका सरचिटणीस सिन्नर, रामदास भोर, सिन्नर शहर अध्यक्ष मुकुंद खर्जे, युवा तालुका अध्यक्ष संकेत सानप, सार्थक काकड, प्रमोद शिंदे, यज्ञेश काळे, विष्णुपंत पाटोळे, राजेंद्र काकड, गौतम काकड, भाऊसाहेब काकड आदी उपस्थित होते.