*निसर्गाच्या कृपेने फुललेल्या मातीचे पूजन करून झालेल्या एका आदिम लग्नाची गोष्ट:*
*निसर्गाच्या कृपेने फुललेल्या मातीचे पूजन करून झालेल्या एका आदिम लग्नाची गोष्ट:*
सिन्नर प्रतिनिधी
भारत मातेच्या कुशीत मूळ अधिवास करणारे आदिवासी बांधव निसर्गालाच देव मानून आपले जीवन चक्र पूर्णत्वास नेतात. जंगलात बहरलेली पाने, फुले, वेली, वृक्ष इतकेच नाही तर झडलेली पानं, तुटलेल्या फांदया, काड्या हेच आपलं सर्वस्व, हेच आपले दैवत मानणारा हा समाज आपल्या सुख दुःखात याच साधन संपत्तीचे स्मरण करतात.
धरणी माता या समाजासाठी जन्म दात्या आई इतकीच पूजनीय.तीची पूजा केल्याशिवाय आपण केलेले कुठलेच कार्य फलद्रूप होत नाही ही त्यांची प्रामाणिक धारणा.
याच धारणेला अधीन राहून बाळासाहेब रामचंद्र मुठे रा.सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचा मुलगा व सामाजिक कार्यकर्ते राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजयभाऊ दशरथ मुठे यांचे बंधू चि. किरण तसेच गोटीराम पांडू खेताधारणी रा.धोंडबार ता.सिन्नर जि.नाशिक यांची मुलगी चि. सौ. कां मथुरा हे नुकतेच विवाहाच्या बंधनात अडकून संसाररुपी प्रेमगृहात रमले आहेत. धरतीमातेचे पुजन क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन केले. धोंडबार ता.सिन्नर या ठिकाणी हे दाम्पत्य अग्नी देवतेच्या साक्षीने जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेत विवाहबद्ध झाले.
आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी व क्रांतिकारक महापुरुषांचे विचार व त्यांची ओळख समाजाला व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे लगीन कार्य आयोजित केले होते.
नवरा नवरीने लगीन लागण्या अगोदर धरतीमातेची, सूर्य-चंद्र,डोंगर,पशू- पक्षी यांच्या प्रतीकृतीचे व वृक्षाचे पुजन करून क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन केले. आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा निसर्ग पुजक आहे.आदिवासी संस्कृती टिकवणे ही प्रत्येक आदिवासी माणसाची जबाबदारी आहे.असा संदेश देणारा हा धोंडबारचा आदिम लगिन सोहळा 21 व्या शतकातील मिथ्या प्रतिष्ठा जपणाऱ्या विवाह सोहळ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला.अशा प्रकारचे निसर्ग पुजक लगिन कार्य प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली नसती तरच नवल.
धोंडबार सरपंच व ग्रामस्थांनी नवरा नवरीला आशिर्वाद देऊन या आदिम लगिन कार्याचे कौतुक केले.या लगिन कार्यसाठी विविध क्षेञातील मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सिताराम मदगे व विशाल कुंदे यांनी आदिम लगिन कार्य पुजा विधी मांडणी केली. तसेच रामभाऊ इदे व लक्ष्मण तळपे यांनी आदिम लगिन विधी पार पाडला. विजयभाऊ मुठे यांनी आदिवासी संस्कृती विषयी उपस्थितांचे प्रबोधन केले.या आदिम लगिन कार्यावेळी यावेळी महामिञ दत्ता वायचळे, सिन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किरणभाऊ डगळे नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, माजी पंचायत समिती सदस्य तातू जगताप,राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे,प्रवक्ते लक्ष्मण तळपे कार्याध्यक्ष गंगारामभाऊ तळपाडे कोषाध्यक्ष सिताराम मदगे, प्रसिद्धी प्रमुख विशाल कुंदे ,महिला अध्यक्ष यमुनताई भांगरे मार्गदर्शक निवृत्ती भांगरे,सह्याद्री प्रमुख जनार्दन कुंदे, राजेंद्र बेंडकुळे, नवनाथ पाडेकर, भगवान तळपाडे,,गोविंद कुंदे ,राजेंद्र चव्हाण, सदाम गोळेसर, बहिरु जाधवसर,दत्तात्रय माळी,निवृत्ती खेताडे,रमेश खेताडे, हनुमंत खेताडे मारुती खेताडे अमोल गवारी,आदि. ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.