राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकार करावे – प्रा. बाबा खरात
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकार करावे – प्रा. बाबा खरात
संगमनेर प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनेतून सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य केले जाते. रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा यातूनच विद्यार्थ्यांना दिली जाते थोडक्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकार करावे असे आवाहन आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात यांनी केले आहे.
संगमनेर येथील एसएमबीटी महाविद्यालय व आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक यांच्या वतीने वेल्हाळे गावात राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गिरीश नाझीरकर, पुरुषोत्तम राखेवार, सुरेश आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा.बाबा खरात म्हणाले की, समाजसेवा व समाज समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यक्तिमत्व विकास करणे याबाबतचे संस्कार हे श्रमसंस्कार शिबिरातून दिले जातात. मनगटात जोर, छातीत जिंकण्याची उर्मी सतत कल्याणकारी विचार असा विद्यार्थी आपणास स्वावलंबी शिक्षणातून घडवायचा आहे. स्वतः बदला जग आपोआप बदलेल घाम गाळून त्यांच्या मोबदल्या जीवन घडवा. जगाचे राज्य धन संपत्ती जमीन जुमला काही नको दुःखितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे सामर्थ्य मिळवा झाडे लावा झाडे जगवा. व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान ,महिला सबलीकरण ,सक्षमीकरण ,पाणी वाचवा ,वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ,सर्व शिक्षा अभियान या कार्यक्रमात सहभाग घेऊन गावाशी नाते जोडून गावाचा विकास विद्यार्थ्यांनी करावा असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी डॉ. गिरीश नाझीरकर, डॉ.पुरुषोत्तम राखेवार यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया पगारे व साईशा सातपुते यांनी केले तर आभार नमिता पूभे यांनी मानले.