आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन
एस जी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यसन व वाईट विचारांची होळी
आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन
सिन्नर प्रतिनिधी
येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस जी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज विभागाच्या वतीने विविध व्यसने धूम्रपान व वाईट विचारांची प्रतीकात्मक होळी पेटवून दहन करण्यात आले.
संस्थेचे सी. ई. ओ. अभिषेक गडाख यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी तंबाखू, गुटखा,विडी,सिगारेट, दारू, वाईट चालीरीती व व्यसने आदींचे फलक विद्यार्थ्यांनी होळीच्या आधी मध्ये जाळून नष्ट केले व अशा प्रकारचे व्यसने व वाईट चालीरिती स्वीकारणार नाही, अशी शपथ घेतली.
संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, प्राचार्य सलीम चौधरी, पर्यवेक्षक रामेश्वर मोगल, कॉलेज विभाग प्रमुख मंगेश गडाख आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास सातपुते, शिवाजी गाडेकर, चंद्रकला साळुंखे, शितल उशिर, प्रमोद कांबळे, प्रविण सोमवंशी, राजू कांबळे, पुष्पा निकम, वैभव उगले,किरण घुगे, वैशाली कोळपे,अतुल पारखे,दगडू रामसे,सुवर्णा सातपुते,माधव कथले,भूषण अहिरराव,अर्चना खरणार, नवनाथ चिने,योगेश खोले, गणेश श्रीमंत आदींनी परिश्रम घेतले.
चौकट:-
होळी सणाचे धार्मिक,ऐतिहासिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. होळीच्या राखेत अनेक प्रकारचे जंतुनाशक तत्व आहे. त्वचा रोग व अनेक व्याधीसाठी ते उपयुक्त असते. प्रदुषण न करता कुप्रथेची होळी करावी.
अण्णासाहेब गडाख
अध्यक्ष, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ, सिन्नर