निष्ठेला कर्तृत्वाची धार, सिन्नरकरांच्या गळ्यात खासदारकीची माळ?
निष्ठेला कर्तृत्वाची धार, सिन्नरकरांच्या गळ्यात खासदारकीची माळ?
रश्मी मारवाडी, किशोर लहामगे /सिन्नर
आज शिवसेना उबाठा पक्षाकडून येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सिन्नरचे राजाभाऊ वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच संपूर्ण सिन्नर तालुक्यात एकच जल्लोष निर्माण झाला आहे.
सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी केलेले समाजकारण आणि राजकारण याची सरमिसळ या उमेदवारीने मतदारांना अनुभवास येणार आहे. स्व.सूर्यभाननाना गडाख, स्व. तुकाराम बाबा दिघोळे यांच्यानंतर सिन्नर सारख्या दुष्काळी भागातून राज्य आणि देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी राजाभाऊंच्या रूपाने तालुक्याला या निमित्ताने मिळत असल्याने जात, धर्म, पंथ इतकेच नाही तर राजकीय मतभेद विसरून आपला माणूस लोकसभेत पाठविण्यासाठी सिन्नरकर आतुर झाले नाही तरच नवल. राजाभाऊंची उमेदवारी जाहीर होताच सर्व सामान्य सिन्नरकर सुखावला गेल्याचे चित्र दिसत आहे.
एक तर सिन्नर आणि शिवसेना हे समीकरण तळागाळात रुजले आहे . त्यात पहिल्यांदा शिवसेना उबाठातर्फे खासदारकीसाठी सिन्नरहून नाव जाहीर झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आज तालुक्या सोबतच नाशिक जिल्हाचे राजकारण समाजकारणतून त्यांच्या पारंपरिक शैलीतून भाऊ किती यशस्वी करतात हे येणारा काळच ठरवेल. मात्र सिन्नरच्या विकासाचे दरवाजे या खासदारकीच्या तिकिटाने उघडले गेले आहेत.या संधीचे सोने कसे करता येईल, यासाठी सिन्नरकर सर्व स्तरातून कसे एकजुटीने उभे राहतात, हे पण येणारा काळच सांगेल. आज तूर्तास तरी निष्ठेला कर्तृत्वाची धार आली असेच म्हणावे लागेल. या निमित्ताने सिन्नरकराना जॅकपॉट लागला आहे. प्रकाशभाऊ वाजे यांची आणि शरद पवार यांची भेट फळाला आली, असेच म्हणावे लागेल. शेतकरी, उद्योग समूह , सामान्य माणूस खूप अपेक्षेने भाऊकडे पाहत आहे. या अपेक्षांना पालवी फुटो याच आपली दुनियादारीकडून शुभेच्छा..