एम.डी. विकणाऱ्या टिप्पर गँगच्या सराईतासह दोघांना अटक गुन्हे शाखा एककडून पुन्हा सक्रिय टिप्पर गँगला लावला लगाम
एम.डी. विकणाऱ्या टिप्पर गँगच्या सराईतासह दोघांना अटक
गुन्हे शाखा एककडून पुन्हा सक्रिय टिप्पर गँगला लावला लगाम
मायकल खरात आपली दुनियादारी
महाराष्ट्र सह संपूर्ण भारताला हादरवून टाकणारा एमडी ड्रग्सचा कारखाना साकीनाका पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन उध्वस्त केल्यानंतर एमडी ड्रग्स निर्मितीमध्ये नाशिक केंद्रस्थान समजलं जाऊ लागलं, नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे गावात ड्रग्स माफिया संशयित ललित पाटील व त्याचा भाऊ यांनी ड्रग्स चा कारखाना थाटल्याबाबत साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका संशयताकडून माहिती मिळाल्यानंतर थेट नाशिक मध्ये येऊन हा अवैध ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केल्याने नाशिक मधील काही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात होता, अगदी म्हणायचंच झालं तर या कारवाईमुळे शहर पोलिसांची प्रतिमा खराब झाल्याने पुन्हा नव्याने आपलं नावलौकिक कमावण्या साठी पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांनी शहरातील वैयक्तिक विक्रीचे प्रयत्न करणाऱ्या पेडलरच्या मुसक्या बांधण्यासाठी कसोशीने मोहीम राबविली. व शहर ड्रग्समुक्त व व्यसनमुक्त व्हावं यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आणि अनेक ड्रग्स विक्रेतांना जेरबंद करत मोक्का अन्वये कारवाई करून तुरुंगात डांबले.
यानंतर शहरात बऱ्यापैकी एमडी ड्रग्स बाबत जास्त काही ऐकिवात येत नव्हते. यातच शहरातील गुन्हेगारी अभिलेखा वरील निखिल बाळू पगारे या टिप्पर गॅंगच्या सराईताने आपल्या व्हाट्सअप वरील स्टेटस वर थेट एमडी ड्रग्स सह व्हिडिओ बनवत शेअर केल्याने एकंदरीत शहर पोलिसांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात होते. नासिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाथर्डी शिवारातील दामोदर नगर स्वरांजली हॉटेलच्या मागे दोन संशयित एमडी ड्रग्स विक्री करतात अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून निखिल बाळू पगारे वय 29 वर्ष राहणार विक्री भवन समोर पाथर्डी फाटा शिवार नाशिक व त्याचा साथीदार कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव वय 22 वर्ष राहणार उत्तम नगर सिडको या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या एक लाख रुपये किमतीचे वीस ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आल्याने त्यांना अटक करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघा संशयीता विरोधात एन डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड हे करीत आहेत. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक विजय धमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, चेतन श्रीवंत, शरद सोनवणे, महेश साळुंखे, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, रमेश कोळी, मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजेश राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अनिरुद्ध येवले, किरण शिरसाठ यांनी पार पाडली आहे.
टिप्पर गॅंग सक्रियचं:
पूर्ण नाशिक गुन्हेगारीने हादरवून सोडणाऱ्या टिप्पर गॅंगने जाळपोळ, लुटमार, जीवघेणे हल्ले, खंडणी अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करत शहर पोलिसांना नाकीनव आनले होते, शहरातील कथित गाड्या जाळपोळ प्रकरणात टिप्पर गँगने एका आमदाराचा सहभाग असल्याचे सांगून सर्वत्र खळबळ उडाली होती, दिवसा ढवळ्या एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची धाडसी लूट केल्याप्रकरणी टिप्पर गॅंगच्या मुसक्या आवळण्यात आल्या व सगळ्या संशयीतांवर मुका अंतर्गत कारवाई करत तुरुंगात टाकण्यात आले होते मात्र एमडी ड्रग्स प्रकरणात टिप्पर गँगचा सदस्य गुन्हे शाखेच्या हाती लागल्याने ही गॅंग पुन्हा सक्रिय झाली की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. अटक करण्यात आलेला संशयित निखिल पगारे हा अवैध अग्निशस्त्र प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी होता.
- गुन्हेगारी व व्यसनमुक्त शहर बनवण्यासाठी पोलिसांना साह्य करा:
- शहरातील तरुणाईला व्यसनाधीन अवस्थेत पाहून पोलीस यंत्रणा संपूर्ण ताकदीने गुन्हेगारी तसेच ड्रग्स चा नायनाट करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे शहरातील सजग नागरिक व माध्यमं हेच पोलीस यंत्रणेचे डोळे व कान आहेत आपल्या नजरेस व कानी पडलेली अप्रिय घटना आपण आपलं कर्तव्य म्हणून पोलिसांना कळवत शहर भयमुक्त व व्यसनमुक्त होण्यासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे माहिती देणाऱ्यांच्या नावाबाबत प्रमुख जबाबदारी समजत गोपनीयता बाळगली जाईल असे आश्वस्त आव्हान शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- पालकांची जबाबदारी: आपला पाल्य काय करतो, त्याची कुणाशी मैत्री आहे? नोकरी, व्यवसाय अथवा शिक्षण घेत असेल तर त्याच्या नेहमीच्या दैनंदिनीत किंवा वर्तनात काही बदल दिसून येतो का? पॉकेटमनी बाबत सतर्क राहून त्याच्याकडून हिशेब घेणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्याच्या नित्य क्रमात, वर्तनात दिसणारा सूक्ष्म बदल हेरून त्याच्यावर लक्ष ठेवल्यास आपला पाल्य एखाद्या अमली पदार्थाच्या आहारी गेला किंवा नाही याचे निरीक्षण पालकच करू शकतात. प्रत्येक पालकाने ही खबरदारी घेतल्यास अनेक पाल्य अशा घातक व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचू शकतील.