पाणी आडवा पाणी जिरवा पद्धतीने वनसंवर्धनात ढग्या डोंगर संवर्धन समितीचा पुढाकार
पाणी आडवा पाणी जिरवा पद्धतीने वनसंवर्धनात ढग्या डोंगर संवर्धन समितीचा पुढाकार
भावी पिढी जंगल कुठे शोधणार?
रश्मी मारवाडी /आपली दुनियादारी
वृक्ष लावा वृक्ष जगवा हा नारा अनेकांना छान वाटतो,पण फार थोड्या लोकांना त्याची गरज पटते व त्यात ते सहभागी होतात. आजच्या जगात अगदी भयावह वेगाने वृक्षतोड होत आहे. हे असेच चालू राहिले तर येणारे पिढीला जंगले बघायलाही मिळणार नाहीत.ही केवळ एक कल्पना आहे की याचा आपल्या जीवनाशी काही संबंध आहे? यावर्षीचा दुष्काळ आणि वातावरणातील बदल तुम्हाला याचे उत्तर देईल. यंदा पाऊस कमी पडला. निसर्गाचे चक्र बिघडले आहे. याचा संबंध वृक्षतोडीशी आहे. वृक्षांमुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरते. हे पाणी नवीन जीवनासाठी उपयोगी पडते. जेव्हा वृक्षांची संख्या कमी असते तेव्हा पुरेसे पाणी जमिनीत जिरत नाही. यासाठी ठिकठिकाणी पाणी अडवून ते जमिनीत जिरेल अशी व्यवस्था करावी लागते. यालाच सोप्या शब्दात “पाणी आडवा पाणी जिरवा” असे म्हणतात.
- सिन्नर येथील ढग्या डोंगरावर ढग्या डोंगर संवर्धन समितीने पाणी अडवा व पाणी जिरवा पद्धतीचा अवलंब करून वनसंवर्धनात पुढाकार घेतला आहे. समितीच्या सर्व सदस्यांनी श्रमदान करून डोंगरावर ठिकठिकाणी बांध घातले आहेत. पावसाळ्यात येथे पाणी अडून ते वर्षभर वनसंवर्धनासाठी उपयुक्त होईल अशी आशा आहे.