क्राईम

मुरबाड- कल्याण राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात ५८ अपघातात, ३६ जण ठार,५८ जण जखमी!


मुरबाड- कल्याण राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात ५८ अपघातात, ३६ जण ठार,५८ जण जखमी!

☝️मराठी संस्कृती जतन करा 

बाळासाहेब भालेराव :मुरबाड

मुरबाड- कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील म्हारळ ते माळशेज घाट महामार्गावर गेली वर्षभरात विविध प्रकारचे जवळपास ५८ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस केंद्र मुरबाड- माळशेज घाटचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल विसपुते यांनी दिली आहे.

Advertisement

. या घटनेची माहिती मिळताच मुरबाड-माळशेज महामार्ग केंद्र येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन अपघात यांची माहिती घेऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची भूमिका महामार्गावरील पोलिस बजवत आहेत त्यामुळे सध्या देवदूत म्हणून या राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस काम करत असल्याच्या प्रतिक्रिया वाहनचालक व नागरिकांनी दिली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर, चंद्रकांत भोये, पोलीस हवालदार राजेंद्र रसाळ, संजय घुडे, प्रवीण गायकवाड, तसेच पोलीस शिपाई मध्ये कैलास कोकाटे, खंडेराव आव्हाड, शरद पाखरे, पोलीस हवालदार अमोल पाटील यांच्यासह इतर पोलीस अंमलदार हे सुद्धा सर्वत्र म्हारळ ते माळशेज घाट पर्यंत सतर्क म्हणून काम करत आहे. तसेच जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान घडलेल्या अपघाताची माहिती मुरबाड माळशेज घाट पोलिसांनी दिली आहे.

 

 

सन२०२४ मध्ये एकूण अपघात-५८

एकूण मयत-३६, एकूण जखमी-. ५८

म्हारळ ते माळशेज घाट पर्यंत ट्राफिक पोलीस चांगली भूमिका बजावून रस्त्यावर घडलेल्या अपघात ग्रस्तांनाचांगली मदत करतात तसेच घाट रस्त्याच्या बाजूच्या गावाकडीची मानसेही मृत्युंजय देवदूत म्हणून काम करत आहेत.

-अनिल विसपुते

सहायक पोलीस निरीक्षक

राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्र

माळशेज घाट मुरबाड जि.ठाणे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *