क्राईम

लोकशाही व युवा लोकसंख्या :मौजे पास्ते गावात तिसऱ्या दिवशीही राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांचे प्रबोधन 


लोकशाही व युवा लोकसंख्या :मौजे पास्ते गावात तिसऱ्या दिवशीही राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांचे प्रबोधन 

          फ्रेंच, रशियन राज्यक्रांतीचे दिले दाखले

 

रश्मी मारवाडी /आपली दुनियादारी

Advertisement

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे पास्ते तालुका सिन्नर येथे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे तिसऱ्या दिवशीही व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते ,आज महामित्र  दत्ताजी वायचळे यांनी भगवान बाबा यांच्या पावन स्मृतींना स्मरून विद्यार्थ्यांना लोकशाही व युवा लोकसंख्या या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच हे मार्गदर्शन करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसन समस्येवर जागरूक केले.लोकशाहीत तरुणांचे योगदान पटवून देत असताना त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती यांची उदाहरण दिली. या कार्यक्रम प्रसंगी गावचे प्रेरणास्थान सेवानिवृत्त पोलिस सहाय्यक उपायुक्त  डी पी आव्हाड  यांनी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.ज्योती गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप , के .व्ही. एन .नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य समन्वयक, प्राध्यापक वर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *