Bussiness

सह्याद्री क्रिकेट बॉक्सचा खा. गोडसे यांच्या हस्ते शुभारंभ 


सह्याद्री क्रिकेट बॉक्सचा खा. गोडसे यांच्या हस्ते शुभारंभ 

सिन्नर प्रतिनिधी
 सह्याद्री क्रीडा प्रबोधनी व राजश्री शाहू महाराज तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व सह्याद्री युवा मंच संस्थापक अध्यक्ष युवा नेते उदय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री क्रिकेट बॉक्स 2024चा शुभारंभ खा. हेमंत गोडसे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

Advertisement
यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या  मनोगतात  सांगितले  की उदय सांगळे  हे नेहमी नवीन नवीन संकल्पना घेऊन येत असतात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा असेल , तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा आणि नेहमी क्रीडाप्रेमींना नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देतात,
 सोळा वर्षाखालील संभाव्य महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेला कौस्तुभ रेवगडे,१९ वर्षाखालील क्रिकेट संघात खेळलेला सिद्धार्थ नक्का,
19 वर्षाखालील पश्चिम विभागीय महिला भारतीय संघ प्रियंका घोडके,
वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ माया सोनवणे एकोणावीस वर्षाखालील पश्चिम विभागीय महिला भारती संघ या खेळाडूंचा खा.हेमंत गोडसे यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.तहसीलदार राहुल कोताडे यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट  नियोजनाबद्दल समाधान  व्यक्त केले.मुसळगाव पोलीस स्टेशनचे पी.आय निकम  यांनी स्पर्धेचं नियोजन व फलंदाजांचे कौतुक केले.
मुसळगाव औद्योगिक वसाहत स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे , यांनी खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी डॉक्टर जी .एस .पवार, प्रभाकर गोळेसर, सुभाष कुंभार, नामदेव लोणारे, बाबुराव शिरोडकर, अनिल पवार, विजय मोरे, अनिल काळे, उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *