*पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी खांद्यावर घेऊन साजरा केला वाढदिवस*
*पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी खांद्यावर घेऊन साजरा केला वाढदिवस*
नासिक प्रतिनिधी :
दि. २७.०६.२०२४ सह्याद्री देवराई गोपालकृष्ण मोहाडी येथे *कु. भक्ती प्रमोद इनामदार* हिने आपल्या १८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून १८ दुर्मिळ देशी प्रजातीच्या वृक्षांची स्वतः रोपे उपलब्ध करून लागवड केली यामध्ये
*ताम्हण, कुंकू, बेल, कवूट, पिंपळ, पेरू, फणस, वड, जांभूळ, चिंच, कडूनिंब, सप्तपर्णी, डिकामली, बकुळ, भेंडी, आवळा, सफेद कांचन, मुचकुंद* ई.प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे.
१८ वर्ष पूर्ण होणे म्हणजे विविध जबाबदाऱ्यांची जाणीव होऊन त्या जबाबदाऱ्या सक्षमपणे आपल्या स्वत:च्या खांद्यावर पेलण्याच हे वय. त्यापैकीच एक जबाबदारी म्हणजे निसर्ग संवर्धनाची जबाबदारी ओळखून कुमारी भक्तीने जो पुढाकार घेऊन विविध १८ दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची लागवड केली त्या झाडांच्या संवर्धनास *११००/- (अकराशे) रुपयांचे* सहाय्य वडील प्रमोद इनामदार यांनी केले.
तसेच सदर अभिनव उपक्रमात नक्कीच इतरही बालगोपालांना,युवकांना,ग्रामस्थांना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या ह्या चळवळीत सामील होण्याची व पर्यावरण संरक्षणात आपले योगदान देण्याची प्रेरणा निश्चित मिळेल.
यावेळी भक्तीने आपल्या या अभिनव कृतीतून इतरांनाही आवाहन केले की “आपणही आपल्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी वृक्षलागवड करून भविष्यासाठी शाश्वत आठवणी ठेवून निसर्ग जपूया…”
तसेच सह्याद्री देवराई परिवाराच्या वतीने भक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ग्रामस्थांकडून तिच्या या अभिनव अश्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
*सह्याद्री देवराई गोपालकृष्ण मोहाडी -नाशिक*