ताज्या घडामोडीशिक्षण

अमृतवाहिनी एमबीएच्या १२ विद्यार्थ्यांची डेसिमल पॉईंट व एसआरजे स्टील या कंपनीमध्ये निवड


अमृतवाहिनी एमबीएच्या १२ विद्यार्थ्यांची डेसिमल पॉईंट व एसआरजे स्टील या कंपनीमध्ये निवड

 

संगमनेर प्रतिनिधी

 

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटदवारे डेसिमल पॉईंट व एसआरजे या कंपन्यामध्ये निवड झाली असुन त्यांना 3 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए चे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली आहे.

 

अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाची स्थापना सहकारातील दुरदृष्टी नेतृत्व असलेले सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात दादा यांच्या संकल्पनेतुन १९९४-९५ मध्ये झाली. माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. गुणवत्ता यादीत अग्रेसर असणाऱ्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. आतापर्यंत महाविद्यालयातुन २५८० विद्यार्थ्यांनी एमबीए पदवी संपादन केलेली आहे.

 

       इंटिग्रेटेड इंटरप्राईझेज (इंडिया प्रा. लि.) 12, प्लेअर्स एनर्जी एलपीपी (औथ चैनल पार्टन व टाटा पॉवर ०९, बजाज कॉपीटल लि. (बजाज फायनान्स) १०, सोलर स्कैंभर एनर्जी प्रा.लि. ०१, प्राइम प्रॉपटीज ०६, टेकनुक एज्युटेक ०२, टेलस इंटरनॅशनल ०१, डेटा मेट्रिक्स ०६, ब्युझ कॉर्पोरेशन लि (अॅक्सीस बँक) ०१, बिग बास्केट ०२, कोलोरेंडो पेन्टस ०१, क्युस्पायडर ०४, डिझाईन टेक सिस्टीम प्रा.लि.०२, किर्तने आणि पंडित ०२, डेसिमल पाईट ०९, नोबेल वायरलेस टेलिकॉम सोल्युशन प्रा.लि.०१, हॉटेल साई सहवास ०१, प्राईमसिटी प्रॉपर्टीज कॉम एलएलपी ०१, एस आर जे स्ट्रील ०३, प्युचर फायन्साशिअल सर्व्हिसेस प्रा. लि.०१ यावरील सर्व ७६ विद्यार्थ्यांची नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झालेली आहे.

Advertisement

 

अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाने दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार, कॉन्फरन्सचे आयोजन व नविन उद्योजक घडविण्याचे कार्य केलेले आहे. अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायम संलग्नित असुन महाविद्यालयाने सर्व क्षेत्रात उच्च निकालाची परंपरा कायम राखली आहे. तसेच महाविद्यालयाने आयएसओ मानांकन प्राप्त केले असुन इ.स.२०१८-१९ मध्ये महाविद्यालयाने जुजीसीचे नॅक मानांकन मिळविलेले आहे. महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन शास्त्रातील पीएचडी संशोधन केंद्र कार्यरत असुन त्यामध्ये २७ विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. महाविद्याल्यामध्ये आठ प्राध्यापक पीएची धारक असुन पीएचडीचे मार्गदर्शक आहे. अमृतवाहिनी एमबीएची ओळख पुणे विद्यापीठातील एक अग्रगण्य महाविद्यालय अशी झालेली आहे.

 

विद्याथ्यांच्या प्लेसमेंटसाठी प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. नितीन सोपान भांड व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

या कॅम्पस प्लेसमेंट दवारे निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात , संस्थेचे विश्वस्त मा.आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयु देशमुख, साखर कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बी. शिंदे, मॅनेजर प्रा. व्हि.बी. धुमाळ शैक्षणिक संचालक डॉ. जे.बी. गुरव यांनी प्लेसमेंट झालेले विद्यार्थी व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयातील सर्व स्टाफचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *