ठाणगाव येथे स्टेट बँकेच्या शाखेची मागणी जनसेवा सेवाभावी संस्थेचे निवेदन
ठाणगाव येथे स्टेट बँकेच्या शाखेची मागणी
जनसेवा सेवाभावी संस्थेचे निवेदन
सिन्नर प्रतिनिधी
ठाणगाव येथे स्टेट बँकेची शाखा सुरु व्हावी यासाठी जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने, सिन्नर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिन्नर शाखेचे मुख्य प्रबंधक शंभू शरण यांना निवेदन देण्यात आले.पंचक्रोशीत बँक ऑफ महाराष्ट्रची एकमेव शाखा असल्याने ठाणगाव,पाडळी, आशापुर, हिवरे पिपळी,माळुंगे,आडवाडी या भागातील नागरिकांचे मोठ्या होणारे आर्थिक व्यवहार अडतात. नवीन बँक शाखा आल्यानंतर शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, ठाणगाव येथील मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात. सिन्नर तालुक्यातील ठाणगावची वर्दळीची बाजारपेठ म्हणून ओळख आहे. या अनुषंगाने जनसेवा सेवाभावी संस्थेने ठाणगाव स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा प्रस्ताव दिला आहे.या प्रस्तावाचे सदर प्रस्ताव सिन्नर मुख्य प्रबंधकांनी नाशिकच्या विभागीय कार्यालयाकडे पाठवला आहे. निवेदन देताना जनसेवा सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रामदास भोर, मोहन आव्हाड, विष्णुपंत पाटोळे, भाऊ शिंदे आदी उपस्थित होते.