महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्यावतीने डॉ. अनिल नहार यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्यावतीने डॉ. अनिल नहार यांचा सत्कार
नाशिक -प्रतिनिधी
नेपाळ येथील गांधी पीस फाउंडेशनच्यावतीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक विविध क्षेत्रांमध्ये बहूमोल योगदान देणाऱ्या समाज भूषण तसेच महावीर इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल नहार यांना “ऑनररी डॉक्टर” या पदवीने नुकतेच सन्मानित करण्यात आले.यावेळी डॉ.अनिल नहार यांचा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी भास्करराव सोनवणे,अपंग संघटनेचे विभागीय सचिव मनोहर नेटावटे, किशोर बाफना, ललित नहार, मोहनलाल कुमावत, गौतम पारख, जायंट्स ग्रुपच्या फेडरेशन संचालिका रंजना भावसार,अध्यक्षा कल्पना सोनार, उपाध्यक्षा स्वाती अंधारे, यंग स्टारचे अध्यक्ष गौरव सोनार,पत्रकार दीपक भावसार,पत्रकार तुषार जाधव, कांतीलाल बन्सल आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन:-
डॉ.अनिल नहार यांचा सत्कार करताना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे समवेत किशोर बाफना, ललित नहार, मोहनलाल कुमावत, गौतम पारख आदि