भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी गणेश राजे यांची निवड
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी गणेश राजे यांची निवड
Advertisement
ठाणे प्रतिनिधी
येथील गणेश राजे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते व भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा ओबीसी मोर्चा प्रभारी विजय चौधरी यांचे हस्ते ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी मोर्चाचे महाराष्ट्रातील सर्व प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
गणेश राजे हे २०११ पासून भाजपाचे कार्यकर्ता स्तरावर काम करत आहेत. तसेच २०११ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ही काम करत आहेत.त्यांनी अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय मंत्री म्हणून २०२१-२२ मध्ये काम केले आहे. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांना अटल फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.तेव्हा पासून ते आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्रा मध्ये अनेक जिल्ह्या मध्ये समाज उपयोगी कामे केली आहेत. या कामाची व भाजपा मधील आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन मोर्चाचे अध्यक्ष संजय गाते यांनी गणेश राजे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे सांगितले. तसेच गणेश राजे यांनी भाजपाला जास्तीत जास्त ओबीसी समाज जोडण्याचे काम प्रामाणिक पणे करणार असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. निवड झाल्यानंतर त्यांचे ठाणे शहरचे भाजपा आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कुटुंब प्रबोधन प्रमूख डॉ. विवेकानंद वडके तसेच बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत,सोलापूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य संतोष निंबाळकर यांच्यासह समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.