ठाणगावमध्ये पंतप्रधान सूचना पत्र पेटीला भरघोस प्रतिसाद
ठाणगावमध्ये पंतप्रधान सूचना पत्र पेटीला भरघोस प्रतिसाद
सिन्नर प्रतिनिधी
नागरिकांनी आपल्या समस्या आणि सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्र पेटीचा उपयोग करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे भटकी विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष, व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड, तालुका सरचिटणीस रामदास भोर यांनी केले आहे.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि विकासात्मक सूचना सरकारच्या निदर्शनास याव्यात यासाठी नागरिकांना सूचना पेटीची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.पंचक्रोशीतील शेतकरी व्यवसायिक , विद्यार्थी, ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रांमधील नागरिकांनी आपल्या समस्या चिठ्ठी द्वारे सूचना पेटीमध्ये टाकल्या.त्यांचे संकलन करून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविल्या जाणार आहेत. येणार आहे.
या उपक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे भटकी विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष, व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस रामदास भोर, भारतीय जनता पार्टी तालुका युवा अध्यक्ष, भारती जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष मोहन आव्हाड ,प्रमोद शिंदे, भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष, राजेंद्र काकड, अशापुर माजी सरपंच तालुका सरचिटणीस विष्णुपंत पाटोळे, समाधान शिंदे, रामहरी रेवगडे, लालू भाऊ शिंदे,मोहन शिंदे, ऋतू आंबेकर, भाऊसाहेब काकड, भाऊराव सोंगळ, अरुण केदार, राहुल केदार, संजू शेठ शिंदे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.