ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अनलिमिटेड पावर फक्त मीडियालाच आहे :- भाऊ तोरसेकर*


*अनलिमिटेड पावर फक्त मीडियालाच आहे :- भाऊ तोरसेकर*

शिर्डी प्रतिनिधी

विरोधक हेच खरे प्रस्थापित असतात. आमच्या विचार धारेवरच चालावे असे म्हणणारे जे असतात तेच खरे प्रस्थापित असतात. प्रस्थापितांच्या विरोधात बोलण्याची क्षमता आपल्यात हवी. गोविंद पानसरे किती छापले ? फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ झाल्याचेही सांगत आजची पत्रकारिता स्वादानुसार झाल्याचे सांगत शोषितांचा विचार मांडणाऱ्यांनाच शोषक आपला विचारवंत घोषित करतात. मराठा, नवाकाळ ही कामगारांची वृत्तपत्र होती तर म टा, लोकसत्ता ही भांडवलदारांचे वृत्तपत्र आहेत.आजचा मीडिया ठराविक लोकांनी कब्जात घेतला असून एंटायर पत्रकारिता करता आली पाहिजे असल्याचे मौलिक प्रतिपादन लेखक अभ्यासक भाऊ तोरसेकर यांनी केले. शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने राज्य शिखर अधिवेशनाचे आयोजन केले होते या अधिवेशनात पत्रकारांचे मनोबल वाढावे पत्रकारांमध्ये प्रबोधन व्हावे पत्रकारांच्या समस्या सुटाव्या या हेतूने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

तोरसेकर पुढे म्हणाले की,

 

 

 

 

 

निकोलस यांना सुद्धा पायउतार व्हावे लागले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांना सर्व अधिकार असतात असे कोणी सांगितले. माणसे चळवळीतून घडतात. परंतु आजच्या चळवळी कॅमेऱ्यापुरत्या मर्यादित झाल्या आहेत . कॅमेरा बंद चळवळ बंद अशी अवस्था समाजाचीही झालेली आहे. खरंतर मीडियाने चळवळी मारून टाकल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कारण काय तर प्रस्थापित हे लाचार आहेत. अनलिमिटेड पावर फक्त मीडियाला आहे कारण तो जागता पाहारा आहे यातूनच ही लाचारी नेस्तनाबूत होईल असा आशावाद तोरसेकर यांनी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *