ताज्या घडामोडी

जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पत्रकारांच्या विविध मागण्यांचा उहापोह 


जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;

 

 

पत्रकारांच्या विविध मागण्यांचा उहापोह 

 

नाशिक प्रतिनिधी 

                        

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ चे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा साहेब यांना पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, पत्रकारिता मध्ये बातमीदारी करताना जमिनीवरचा पत्रकार हा ज्या बातम्या देतो त्याच बातम्यांमुळे आजपर्यंत वृत्तपत्र व चॅनल्स यांचे नाव मोठे झाले आहे. परंतु सध्या या जमिनीवरच्या छोट्या पत्रकारांकडे जिल्हा माहिती कार्यालय दुर्लक्ष करीत असून साप्ताहिक वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांकडे लक्ष न देता फक्त दैनिक वृत्तपत्र चालवणारे व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर काम करणाऱ्या मोजक्या पत्रकारांनाच प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

 

तसेच RNI येथे नोंदणीकृत असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरात तसेच सर्व दैनिक वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या सुविधा जसे की निवडणुका, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या विशेष कार्यक्रम दौऱ्याप्रसंगी बातमीदारी करण्यासाठी देण्यात येणारे पत्रकारांचे पासेस ची सुविधा त्यांना मिळावी. तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या वृत्तवाहिनी लोकल पत्रकार जसे की जे स्थानिक केबल नेटवर्कवर प्रसारित होणाऱ्या वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांना ही वरील प्रमाणेच वागणूक देण्यात यावी. व्हीआयपी दौऱ्याच्या वेळेस त्यांनाही बातमी कव्हर करण्यासाठी पासेस देण्यात यावे.

 

त्याचप्रमाणे रजिस्टर न्यूज पेपर ऑफ इंडिया दिल्ली येथे मागील आठ दहा महिन्यापासून नवीन वृत्तपत्र सुरू करण्यासाठी होणारा त्रास तसेच जे वृत्तपत्र सुरू आहेत. त्यांचे वार्षिक विवरण भरण्यासाठी होणारा त्रास बघता हे संकेत स्थळ सुरळीत सुरू करणे गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने आता सुरू झालेले प्रेस सेवा पोर्टल हे सुरळीत पद्धतीने सुरू राहावे. त्यासाठी देशात फक्त दिल्ली पुरते ऑफिस कार्यालय न ठेवता त्यांचे रिजनल म्हणजे राज्यव्यापी प्रत्येक राज्यात त्या त्या भाषेनुसार कार्यालय सुरू करावे. अशी मागणी आम्ही करीत आहोत. त्यामुळे येणाऱ्या अडचणी व निर्माण होणारे प्रश्न यांचे उत्तर ज्या त्या राज्यातच सोडवता येतील व सर्व पत्रकार मंडळींना सोयीस्कर होईल. अशी मागणी आम्ही आमच्या नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करीत आहोत. आमच्या मागण्यांवर तात्काळ विचार करून कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Advertisement

 

*नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मागण्या पुढील प्रमाणे…*

 

1- पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. (समितीची नेमणूक करून पत्रकार संघातील सदस्यांचा समावेश करणे)

 

2- साप्ताहिक वृत्तपत्र व लोकल वृत्तवाहिनी पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयातून दुय्यम वागणूक मिळते त्यामुळे सर्व पत्रकार प्रमाणे वागणूक मिळावी.

 

3- विशेष कार्यक्रम प्रसंगी अर्थात राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री दौरे तथा सर्व निवडणुका या वेळेस बातमीदारीसाठी पासची व्यवस्था करण्यात यावी.

 

4- न्युज पेपर ऑफ रजिस्टर RNI या संस्थेचे कार्यालय राज्यस्तरीय स्तरावर सुरू करावे.

 

5- स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना प्राधान्य देऊन त्यांनाही बातमीदारीसाठी पासची व्यवस्था करावी. (स्थानिक केबल नेटवर्कद्वारे प्रसारित होणाऱ्या चैनल साठी)

 

6- नाशिक शहरात पत्रकारांसाठी पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

 

7- RNI या संस्थेची वेबसाईट सुरळीतपणे सुरू करून नव्याने सुरू होणारे वृत्तपत्र व जुन्या वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांना कोणतीही गैर सोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.

 

8- दैनिक वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिराती प्रमाणेच साप्ताहिक वृत्तपत्रासाठी जाहिराती देण्यात यावे.

 

9- सध्या डिजिटल युग सुरू असल्याने डिजिटल पत्रकारिता वेब पोर्टल अधिकृत करण्याचा विचार करून त्याचे रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यात यावी.

 

यावेळी निवेदन देताना संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार, कुमार कडलग, जिल्हा सरचिटणीस दिनेशपंत ठोंबरे, तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी, उपाध्यक्ष सुनीता पाटील, उपाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, विश्वास लचके, संघटक जनार्दन गायकवाड, भाऊसाहेब बोराडे, शमशाद पठाण, संजय हिरे, दिनेश पगारे, प्रवीण सुरडे, संदीप नगरकर, योगेश रामोळे, नंदकुमार जाधव, परमेश्वर आंधळे, सुनील पगारे, कमलाकर तिवडे, सचिन गायकवाड, नासीर मंसूरी सह नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांचे संचालक संपादक साप्ताहिकांचे संपादक उपस्थित होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *