राज्य स्तरीय सरपंच आणि उपसरपंच यांच्या विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा
राज्य स्तरीय सरपंच आणि उपसरपंच यांच्या विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा
हिवरगाव पावसा प्रतिनिधी
गावच्या विकासासाठी सरपंच नेहमीच कार्यरत
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काम करत आहे. सरपंच हा ग्रामीण विकासाचा शिल्पकार आहे. अत्यंत भव्यदिव्य व महत्वकांशी असे अनेक उपक्रम निःस्वार्थी भावनेतून सरपंच काम करित असतो. गटतट सोडून गावच्या विकासासाठी एकत्र येणाऱ्या ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे कौतुक व्हायला हवे. त्यांनी गावामध्ये एकत्र येऊन विकासाला नवी दिशा दिली.
सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे व्यक्तिमत्व आपल्या कार्याच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करून गावच्या ग्रामस्थांना व्यक्तिगत लाभाच्या योजनेचा फायदा करून देण्यासाठी अहोरात्र काम करत असतो. गावात स्वच्छता अभियान अंतर्गत विविध विकासकामे स्मशानभूमी सुशोभिकरण वृक्ष लागवड उपक्रम गावातील शाळा डिजीटल व गुणवत्ता पुर्ण मुलांच्या शैक्षणिक उपक्रमांत प्रोत्साहन देण्यासाठी
प्रयत्न असे अनेक उपक्रम योजना यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी सरपंच कटिबध्द असताना उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामसंस्थांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सरपंचांचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सरपंच सेवा संघाच्या वतीने केला जातो.
यासाठी विविध प्रकारच्या निकषाप्रमाणे यांची निवड केली जाते. सरपंच हा ग्रामीण भागाचा मुख्य आकर्षण आहे. गांव अंतर्गत रस्ते, काँक्रीटीकरण तसेच पाणी टंचाई असो, गारपीट असो की गावातील विविध अडचणींसाठी सरपंच रात्री बे रात्री मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व गावात पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू ठेवणे, गावाच्या सुरक्षितेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे. गावात प्रथमोपचार आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. सार्वजनिक जयंती धार्मिक सण, उत्सव साजरा करणे अशी जबाबदारी सांभाळताना आदर्श काम निर्माण करणाऱ्या आदर्श सरपंचाचा गौरव करण्याचा सरपंच सेवा संघाचा प्रयत्न आहे. या सगळ्या संघटनात्मक कार्याची प्रेरणा घेवून मुंबई येथे सरपंच आणि उपसरपंच यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.