ताज्या घडामोडी

भाजपच्या वतीने ठाणगाव येथे प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान 


भाजपच्या वतीने ठाणगाव येथे प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान 

 

 

सिन्नर प्रतिनिधी 

ठाणगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रगतशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. निवड समितीने निवडलेल्या १७ प्रगतशील शेतकऱ्यांना जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड , ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे , जिल्हा सरचिटणीस शरद कासार आदित्य केळकर , सिन्नर तालुका पश्चिम आध्यक्ष बहिरू दळवी, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस रामदास भोर ठाणगावचे उपसरपंच विलास मोरे युवा नेते प्रतीक शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.

Advertisement

यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी भारतीय जनता पार्टी नाशिक नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांना केंद्र सरकार राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाला प्रगतीपथावर आणले आहे, आपला देश लवकरच अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या स्थानावर जाणार आहे, येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मतांनी विजयी करा, असे आवाहन केले. महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी ,आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावांमधील सर्व विकासाची काम मार्गे लावू.सर्व रस्ते लवकरात लवकर पूर्ण करू, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची योजनांची माहिती दिली

यावेळी, राधाकिसन काकड, वसंत आव्हाड, मोहन आव्हाड, राजेंद्र काकड, बाळासाहेब शिंदे पाटील, शिवनाथ शिंदे, राजेंद्र केकान, राजेंद्र कांगणे, रामचंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय काकड, संदीप शिंदे, शांताराम शिंदे, रामहरी रेवगेड, बाळासाहेब रामभाऊ शिंदे, या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आत्माराम शिंदे, पाडळीचे सरपंच सुरेखा रेवगडे , राजेंद्र काकड ,अक्षय घुगे,यज्ञेश काळे ,प्रमोद शिंदे,के एल शिंदे सुनील आंधळे, संजय शिंदे, सोमनाथ शिंदे, सुभाष शिंदे, राजू मंडोळे, हिरामण मध्ये, अक्षय मेंगाळ, केरू शिंदे, मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते व शेतकरी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *