ताज्या घडामोडी

वन विभाग अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा ; प्रहार जनशक्ती :-नरभक्षी बिबट्याच्या जाचाने त्रस्त शेतकऱ्यांची मागणी


वन विभाग अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा ;
प्रहार जनशक्ती :-नरभक्षी बिबट्याच्या जाचाने त्रस्त शेतकऱ्यांची मागणी

सिन्नर प्रतिनिधी
गेल्या 2 वर्षांपासून बिबट्या व वाघ या हिंसक प्राण्यांनी सिन्नर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. असंख्य बिबटे व वाघ तालुक्यात संचार करत असून पाळीव, दुभती जनावरे तसेच लहान मुले म्हातारी माणसे यांचे बळी घेत असल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.प्रसार माध्यमातून अशा प्रकारच्या बातम्याही सातत्याने येत आहेत.थोडक्यात या हिंस्र प्राण्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक आणि जीवितहानी होत असताना वन विभाग निद्रिस्त असल्याने तालुक्यातून वन विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याच नाराजीतून प्रहार जनशक्ती पक्षाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी विचित्र मागणी केली आहे.

Advertisement

पोलिस अधीक्षक तसेच सिन्नर पोलिसांना दिलेल्या तक्रार वजा निवेदनात म्हटले आहे की, सिन्नर हे अभयारण्या नाही किंवा या परिसरात घनदाट जंगल देखील नाही, तरीही या परिसरात वाघ व बिबट्या यासारखे हिंसक प्राणी वावरातात. सिन्नर तालुक्यातील अनेक गावांपैकी खोपडी बू व गोंदे, धोंडवीर नगर येथील नागरिक अतिशय भयभीत झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली आहे. तक्रार अर्जही दिले आहेत. तरीही वन अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने,अनेक तक्रारी देऊनही वन विभाग यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संतप्त प्रहार जनशक्तीचे सिन्नर ता. अध्यक्ष कैलास दातीर, तक्रार निर्मूलन . तालुका अध्यक्ष गणेश म्हस्के, पत्रकार प्रवीण पवार व इतर पदाधिकारी यांच्याकडून नाशिक वनरक्षक अधिकारी व ता. वनरक्षक अधिकारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी केली आहे. तसेच पुन्हा सिन्नर तालुक्यात हल्ले झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचाही इशारा या तक्रार वजा निवेदनात दिला आहे. या तक्रार अर्जावर तालुका अध्यक्ष कैलास दातीर,गणेश म्हस्के, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष पुष्पा भोसले. शहर उपाध्यक्ष संगीता आगळे,नवनाथ जडगुले आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *