अंबड एमआयडीसीतील स्क्रॅप घोटाळ्याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे- अविनाश शिंदे; वंचित बहुजन आघाडीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन
अंबड एमआयडीसीतील स्क्रॅप घोटाळ्याची
सीआयडी चौकशी झाली पाहिजे- अविनाश शिंदे;
वंचित बहुजन आघाडीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन
नाशिक-प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना लाखो रुपयांच्या चुना लावणाऱ्या वजनकाट्यावरील फेरफारीची सीआयडी चौकशी करून पाळेमुळे शोधून काढावीत,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप मालाचे वजन करतांना त्यात फेरफार करून उद्योजकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आल्याने अंबड औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली आहे. मोजमाप करणाऱ्यांना हाताशी धरून वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जाते यामुळे हे वजनकाटे पुन्हा चर्चेत आले आहेत.वजनमापे विभागाचा हलगर्जीपणा यास कारणीभूत असून या खात्याच्या कुणाकुणाचा यात सहभाग याची कसून सीआयडी चौकशी करण्याची गरज आहे.अंबडमधील महाराष्ट्र वजनकाट्यासह तीन काटे अंबड पोलिसांनी सील करून त्याचा डेटा संकलित केला असला तरी हे प्रकरण खूपच गंभीर असून स्क्रॅपचे वजन करण्यास कंपनीतच वजनकाटे बसवावेत का,अशा विचारापर्यंत उद्योजकांना यावे लागते,ही बाब निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल.अंबड औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांनी वजनकाटे मालकांशी संगनमत करून कंपन्यांमधून भरणारे स्क्रॅप मटेरिअलचे वजन कमी दाखविण्याचा करिश्मा केला व पावत्यांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांची लूट केल्याचा हा प्रकार आहे. एकाने तक्रार केल्यानंतर वजनकाट्यांमध्ये असलेला हा सारा घोळ उघडकीस आला. मात्र हा घोळ झाल्यानंतरही वजनमापे विभागाकडून याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने या खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने तर हे सारे घडत नाही ना या अनुषंगानेही चौकशी झाली पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे.
दर महिन्याला या वजनकाट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम वजनकाटे विभागाचे आहे.या खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात सुरू केला का हे जगासमोर येणेही गरजेचे आहे. याप्रकरणी स्क्रॅप मटेरियल खरेदीदार अभिषेक शर्मा याला पोलिसांनी तब्येत घेतले असले तरी स्क्रॅप,भंगार विकत घेऊन त्याचा काळाबाजार करणारे अजूनही काही लोक समोर येण्याची शक्यता आहे. या उद्योजकांना काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे का? एवढी मोठी हिंमत हे दुकानदार कोणामुळे आणि कशामुळे करतात हे चौकशीअंतीच निष्पन्न होणार असल्याने या सर्व प्रकरणाची जीएसटी, आयकर खाते तसेच सीआयडीमार्फत चौकशी झालीच पाहिजे. उद्योजकांना गंडा घालण्याचे असे प्रकार सुरू राहिल्यास उद्योजक नाशिक मधून आपले प्रकल्प अन्यत्र हलविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रोजगारासाठी नाशकात येणाऱ्या बेरोजगारांवर की कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व वजन काट्यांमध्ये असे फेरफार सुरू असताना केवळ एकाच वजन काटा च्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो ही बाबही संशयास्पद आहे. उर्वरित वजन काटे चालकांना कुणाचा राजकीय वरदस्त आहे का याचीही चौकशी झाली पाहिज,अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड माजी नगरसेवक स्थायी समिती संजय साबळे महानगर प्रमुख अविनाश शिंदे बजरंग शिंदे,सुनील साळवे,प्रदीप खडसे,संदीप काकळीज ,सुरज गांगुर्डे,संदेश सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.