*उत्सव लोकशाहीचा, वेध मतदार संघातील प्रश्नांचा*
*उत्सव लोकशाहीचा, वेध मतदार संघातील प्रश्नांचा*
सुयोग्य पर्यटन विकास आराखडा तयार केल्यास अकोले तालुक्यात पर्यटन सेक्टर उभे राहील.
शब्दांकन – नितीनचंद्र भालेराव
भाग १ – अकोले (अहमदनगर)
अकोले विधानसभा मतदार संघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने अनुसूचित जमाती करिता (एसटी) राखीव असलेला मतदारसंघ. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, भंडारदरा धरण, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई , निसर्गाने नटलेला हरिषचंद्र गडाचा परिसर, अनेक ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरे, भंडारदरा, निळवंडे या मोठ्या धरणांसह अनेक छोट्या धरणांचा समूह आणि निसर्ग पर्यटनासाठी अकोले तालुका प्रसिद्ध आहे.येथे पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे.सुयोग्य पर्यटन विकास आराखडा तयार केल्यास औरंगाबाद सारखे पर्यटन सेक्टर उभे राहील.तरुणांना शासनाने पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी भागभांडवल दिल्यास,प्रशिक्षित गाईडची कार्यशाळा,प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन केल्यास रोजगार निर्मिती होण्यास मोठी मदत होईल.
मतदार संघातील महत्वाचे प्रश्न –
पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे परंतु पर्यटन विकास आराखडा नसल्याने पर्यटन विकास रखडला आहे.पर्यटक निवासस्थाने,पर्यटकांसाठी वाहतुकीच्या सुविधेचा अभाव,प्रशिक्षित गाईडची कमतरता इ.अनेक कारणांमुळे पर्यटन विकास रखडला आहे.
महावितरणचा दुजाभाव अनेक गावांना मध्ये मोठ्याप्रमाणात लोडशेडिंग केले जाते.कृषी पंपाची लाईट सलग व पूर्ण क्षमतेने मिळत नाही.शेतकरी महावितरांच्या लपंडावामुळे त्रस्त आहे.लाईट आहे तर पाणी नाही पाणी आहे तर लाईट नाही अशाप्रकारे दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.मोबाईल नेटवर्क कोमात गेलीली यात्रांणा यामुळे मोबाईल द्वारे संपर्क करण्यास नेहमीच अडथळा येतो.घाटघर,साम्रद,कोकणकडा या पर्यटन ठिकाणी मोबाईला नेटवर्क मिळत नाही.संपर्क सेवा विस्कळीत झाल्यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो.आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करता येत नाही.
तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था कायम स्वरूपी विकासात अडथळा ठरला आहे.पर्यटनस्थळांकडे जाणारे खराब रस्ते,महत्वाच्या गावाना जोडणारे मार्ग,ग्रामीण भागातून जाणारे अनेक खड्डेमय रस्ते नागरिकांचे आरोग्य बिघडवत आहे. खराब रस्ते असल्यामुळे शहरातील व्यापारी,ट्रान्सपोर्ट कंपन्या येथे येऊन शेत माल खरेदी करत नाही.त्यामुळे शेतक-याला स्वतःच खर्च करून शेतमाल बाजारपेठेत घेऊन जावा लागतो.
वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांचा अभाव अकोल्यातील जनतेच्या प्रगतीत अडसर ठरत आहे.आजही काही गावे आहेत त्या गावात एस.टी पोहोचली नाही.तेथे जाण्यासाठी प्रवाशांना,विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत पर करावी लागते.सर्वात गंभीर बाब म्हणजे अकोले एस.टी आगारातील अनेक मोडकळीस आलेल्या,नादुरुस्त बस प्रवाश्यांची वाहतूक करत आहे.या कडे दुर्लक्ष केले जात आहे.
अनेक आश्रम शाळेंच्या इमारतींची झालेली दुरावस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस अडथळा ठरत आहे.विनानुदानित शाळेत गरीब विद्यार्थाला शिक्षण परवडत नाही.त्यामुळे शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढले आहे.उच्च शिक्षणासाठी निवडक महाविद्यालय असल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षणासाठी अकोले,संगमनेर,पुणे,नाशिक येथे जावे लागते. परिणामी येथील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का कमी दिसत आहे.
आदिवासी बालकांचा कुपोषणाचा प्रश्न मोठा आहे.आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.घरकुल योजना,व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा प्रचार करून अंमलबजावणी केली पाहिजे.अभयारण्य घोषित भागात तसेच लगतच्या गावांन मध्ये चुकीच्या शासकीय धोरणांनामुळे रस्ते आणि विकास कामे रखडली आहे.त्या भागात वन विभाग व ग्रामविकास विभागाने समन्वयाने तोडगा काढला पाहिजे.शेती कुंपण योजना राबविल्या पाहिजेत, शासकीय महाविद्यालय सुरु केल्यास गरिब विद्यार्थी उच्च शिक्षण घेणे शक्य होईल.दूरदृष्टी असलेले नेतृत्व,प्रभावी अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा असेल तर रस्ते विकास,वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांची निर्मिती आणि सुयोग्य पर्यटन विकास आराखडा तयार केल्यास औरंगाबाद सारखे पर्यटन सेक्टर उभे राहील.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत जनता विकास कामाला महत्त्व देत आहे.
बाळासाहेब नवाळी,संचालक चंद्रकांत पेट्रोलियम राजूर
आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. आदिवासी तरुणांना शासनाने पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी भागभांडवल दिल्यास,प्रशिक्षित गाईडची कार्यशाळा,प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन केल्यास रोजगार निर्मिती होण्यास मोठी मदत होईल.कळसुबाई शिखरा जवळ अभयारण्य घोषित भागात पेंडशेत गावात वन्य प्राणी वांद्रे यांचा मोठा उपद्रव आहे.हि वांद्रे शेतक-यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.या भागात शेतात इतर पिके घेता येत नाही.त्यामुळे या भागात हिरडा संशोधन प्रकल्प सुरु करावा.हिरडा या औषधी वनस्पती लागवडी करता आवश्यक वातावरण या परिसरात आहे.हिरडा या औषधी वनस्पतीच्या विविध जाती,लागवड तंत्र,आवश्यक सोयी सुविधा अनुदान उपलब्ध करून दिल्यास या भागाचा कायापालट होण्यास मदत होईल.