डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिगंबर पठारे यांचा सेवापूर्ती समारंभ
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिगंबर पठारे यांचा सेवापूर्ती समारंभ
सिन्नर प्रतिनिधी:-
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिगंबर दादा पठारे यांचा सेवापूर्ती समारंभ गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता माऊली लॉन्स येवला संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी तालुका संचालक अंबादास बनकर असतील. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या शुभहस्ते सेवापूर्ती सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, मविप्र संस्थेचे येवला तालुका संचालक नंदकुमार बनकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, येवला तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट साहेबराव कदम,डुबेरे जनता विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या वामने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
प्राचार्य पठारे हे ३२वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे. त्यांनी सन १९९२ पासून आपल्या सेवेचा श्रीगणेशा केला.त्यांनी देशमाने, वासोळ, मांडवड,मुखेड,पाटोदा, डुबेरे , आदी ठिकाणी काम केले आहे. इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवूनअथक परिश्रम घेतले.
तरी या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यालयाचे पर्यवेक्षक रामदास वाजे आदींसह शालेय समितीचे सदस्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे .