राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाच्या दिव्यांग विभाग जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे, शहराध्यक्षपदी बोडके
राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाच्या दिव्यांग विभाग जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे,
शहराध्यक्षपदी बोडके
नाशिक: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने व दिव्यांग सेल प्रदेश सरचिटणीस मदनकुमार इंगळे यांनी नाशिक जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे व शहराध्यक्षपदी रामदास बोडके यांची नियुक्ती जाहीर करत पक्ष निरीक्षक पालघर विधानसभा आमदार अनिल भुसारा व जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत सत्कार करण्यात आला.
बाळासाहेब सोनवणे हे निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र असून ती गेली पंचवीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटनेच्यावतीने दिव्यांग सशक्तीकरणासाठी जिल्ह्यात नाशिक विभागामध्ये काम करत आहेत. तसेच दिव्यांग क्षेत्राबरोबरच सामाजिक,शैक्षणिक,कृषी, धार्मिक,विज्ञान इ. क्षेत्रातही काम करत आहे.सतत दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आग्रही असतात.
पक्षनिरीक्षक पालघरचे आमदार अनिल भुसारा यांनी आपल्या मनोगत अपंग बांधव न्याय हक्कापासून वंचित असून त्यांच्या पुनर्वसनासाठी तसेच अपंग व्यक्तीला समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाळासाहेब सोनवणे नक्कीच दिव्यांग सेल च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना न्याय देतील अशी त्यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब सोनवणे यांचे दिव्यांगांसाठीचे कार्य व धडपड ही मी गेली वीस वर्षापासून पाहत आहेत अपंगांना न्याय मिळवून देण्याचं कार्य ते करत आहे यापुढेही त्यांनी पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दिव्यांग सेलच्या माध्यमातून सर्वसामान्य दिव्यांगांच्या विकासात भरीव कार्य करण्याची अपेक्षा पक्षाची असल्याचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब सोनवणे यांनी निवडीबद्दल मनोगत व्यक्त करताना नाशिक जिल्ह्यात सर्वच विभागांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कायदा १९९५ व २०१६ तसेच शासन निर्णय,परिपत्रके नुसार सर्वच विभागातील दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय-निमशासकीय तसेच महामंडळे इत्यादी सर्व ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.दिव्यांग बंधू-भगिनींना न्याय मिळवून दिला जाईल असे सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इगतपुरी तालुका अध्यक्ष काशिनाथ कोरडे यांनी केले. यावेळी चिंतामण गावित, जिल्हा युवक अध्यक्ष विष्णुपंत थेटे,जिल्हा सरचिटणीस सुवर्णा गांगुर्डे,एडवोकेट तुषार जाधव,आकाश पारख, अमजद पटेल, नवनाथ लहामगे आदिंसह मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*कोट*👇
बाळासाहेब सोनवणे यांचे दिव्यांगांसाठीचे कार्य निस्पृह:-
बाळासाहेब सोनवणे यांचे दिव्यांगांसाठीचे कार्य व धडपड ही मी गेली वीस वर्षापासून पाहत आहेत अपंगांना न्याय मिळवून देण्याचं कार्य ते करत आहे यापुढेही त्यांनी पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दिव्यांग सेलच्या माध्यमातून सर्वसामान्य दिव्यांगांच्या विकासात भरीव कार्य करण्याची अपेक्षा पक्षाची आहे.
श्री.कोंडाजी मामा आव्हाड,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष,नाशिक
*फोटो कॅप्शन*
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दिव्यांग सेल जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना पक्ष निरीक्षक आमदार अनिल भुसारा व जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यावेळी समवेत जिल्हा युवक अध्यक्ष विष्णुपंत थेटे,काशिनाथ कोरडे आदि उपस्थित होते.