शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन साजरा
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन साजरा
सिन्नर प्रतिनिधी
शहीद हुतात्म्यांना मानवंदना देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन तथा आदिवासी दिन साजरा करण्यात आला.येथील हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड.संजय सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
तुकाराम मेंगाळ,दत्ता गोळेसर,सेवानिवृत्त प्रा.दत्तात्रय डोंगरे, हेमंत देवनपल्ली यांच्या हस्ते शहीद कान्होजी भांगरे ऊमाजी नाईक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
आॅगस्ट क्रांती दिन,हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याला वळण देणारा महत्वपूर्ण दिवस आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी ज्या शुरवीरांनी बलीदान दिले.त्यात आदिवासी मुळ निवासींनी दिलेले हौतात्म्य विसरता येणार नाही.असे प्रतिपादन नामदेव कोतवाल यांनी केले.
९ आॅगस्टला ब्रिटीशांना हुसकावून लावण्यासाठी चले जावचा मंत्र दिला.पण या दिनाचे महत्त्व आजच्या तरुण पिढीला नसल्याची खंत दत्ता गोळेसर यांनी व्यक्त केली.
अॅड.सोनवणे.तुकाराम मेंगाळ.डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले.शहीद हुतात्मे अमर रहे,भारतमाता की जयच्या घोषणा देण्यात आल्या.नगरसेवक रूपेश मुठे,डाॅ.विष्णु अत्रे,मंगला गोसावी,विजय मुठे, राजेंद्र पथवे,पांडुरंग सोनवणे,रामु ईदे,आकाश बर्डे,यमुना भांगरे, युवराज चव्हाण आदी उपस्थित होते.नामदेव लोणारे यांनी आभार व सुत्रसंचलन केले.