कोण या डॉक्टर भारती पवार?
कोण या डॉक्टर भारती पवार?
दिंडोरी मतदार संघातील केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना डॉ. सयाजी गायकवाड यांचे काही प्रश्न ?
नासिक प्रतिनिधी
१.मागील निवडणुकीत तुम्ही स्वार्थासाठी शरद पवार यांच्याशी प्रामाणिक न राहता अचानक बीजेपीचे उमेदवार म्हणून सक्रिय झाला. ताई अडचणीच्या वेळी तुम्ही माननीय शरद पवार यांच्याशी दगा फटका करून किंवा तुमचा स्वार्थ म्हणून पक्ष बदलून बीजेपीकडून खासदार म्हणून निवडून आला नाही का ?
२.गेली पाच वर्षे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंतप्रधान मोदींचे व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कमीत कमी कांद्याची माळ लोकसभेत घालून लक्ष का वेधले नाही ?
३.पोळ कांदा व लाल कांदा उत्पादनासाठी प्रती हेक्टरी किती खर्च येतो हे जाहीर करा शेतकऱ्यांचे कष्ट सोडून ?
४.जवळजवळ एक लाख रुपये किमतीचे खते, रासायनिक औषधे , एक हेक्टर वर खर्च येतो त्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो म्हणजे शेतकऱ्यांकडून प्रति हेक्टर 18000 रुपये पाठीमागच्या खिशातून गुपचूप काढून या जखमेवर मलम म्हणून शेतकऱ्यांना 6000 रुपये कशा करता वाटप करता ? सरळ सरळ शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खते औषधे बी बियाणे शेत अवजारे या वरील जीएसटी रद्द का करत नाही ?
५.संपूर्ण देशामध्ये 2022-23 मध्ये साधारणता 30 – 35 लाख मॅट्रिक कांदा चे उत्पादन होत असताना 31 मार्च नंतर फक्त तीन लाख मॅट्रिक टन कांदे निर्यातीला परवानगी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसली नाही का ?
६.अहो डॉक्टर भारती पवार …
नाफेड कडून कांदा खरेदी करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबीयांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या स्वतःच्याच कंपन्या काढून शेतकऱ्यांचे व शासनाचे लूटमार करण्याचे धोरण अवलंबिले नाही का ?
७.घाऊक व्यापाऱ्यांवर Income tax, Ed ,CBI खात्याच्या धाडी टाकून दहशत निर्माण करून कांद्या चे गेली पाच वर्षात अनेक वेळा जाणीवपूर्वक दर पाडले याची जाणीव आपणास नाही का ?
८.कांद्याचे भाव हेतू पुरस्कार व शेतकरी हित विरोध म्हणून पाडले जातात मग आज शेतकऱ्यांनी आपणास व आपल्या हुकूमशाही शेतकरी विरोधी मोदी सरकारला पाडले तर आपले मत काय नोंदवाल ?
कांदा निर्यातीवरती किती शुल्क आणि ते शुल्क गरजेचे आहे का ? या संदर्भात आपण खुलासा करू शकतात का ? स्पष्ट सांगा
९.भारताचा कांदा हा विविध देशांमध्ये निर्यात केला जातो भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी असताना त्याचप्रमाणे बांगलादेश ,मलेशिया आणि संयुक्त अमिराती हे प्रमुख कांद्याचे आयातदार देश असताना आपल्या धरसोडीच्या कांदा निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात पिळवणूक करण्यात आली व शेतकरी देशोधडीला लागत आहे त्याबाबत आपले मत काय ?
८- अनेक शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे शिक्षण विवाह थांबले त्याबाबत आपले धोरण काय खुलासा करा ?
९- आम्हाला आमच्या पोटाचे पडले. आमच्या मुला मुलीच्या लग्नाच्या खर्चाचे पडले आम्हाला नको अयोध्येतील राम मंदिर कारण पूर्व काळापासून आमच्या खेडेगावात राम मंदिर आहे तसेच आमच्या पोटापाण्याच्या प्रश्नामुळे ३७० कलम सुद्धा आम्हाला गरजेचे नाही.
आम्हाला पाहिजे आमच्या मुलांना नोकरी धंदा व शिक्षण व आरोग्याच्या सवलती
बाकी तुमची अशी 2014 सारखी खोटी गॅरंटी नको आता, गरजेची आहे शाश्वती जगण्याची.
–डॉ सयाजी गायकवाड़,चांदवड़, नाशिक