समनेरे येथे महिलादिना निमित्त विशेष ग्रामसभेत कृषी, आरोग्य, विकासावर महिलांना मार्गदर्शन
समनेरे येथे महिलादिना निमित्त विशेष ग्रामसभेत कृषी, आरोग्य, विकासावर महिलांना मार्गदर्शन
बेलगाव कुऱ्हे :
इगतपुरी तालुक्यातील समनेरे येथे महिलादिना निमित्त विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत कृषी, आरोग्य आदी विषयांवर तसेच महिलांच्या अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली. महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर डॉ रोहिणी जाधव यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक रुपाली बिडवे, कविता नाईक यांनी सेंद्रिय शेती, फळबाग लागवड, शेतकरी अपघात विमा, प्रधानमंत्री पिक विमा। कृषी विभागातील इतर योजना विषयी माहिती दिली. स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे असल्याचे ज्ञानेश्वर उगले यांनी सांगितले.
विकासाच्या नऊ संकल्पनांवर व त्या आधारित महिला बालस्नेही गाव याबद्दल ग्रामविकास अधिकारी ललिता भामरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच साहेबराव जाधव, रामदास जाधव, तानाजी उगले, सिंधुताई जाधव,
कार्यक्रम यशस्वी तेसाठी गोरख दिघे, सचिन उगले, मनीषा उगले, वत्सला दिघे, यांनी प्रयत्न केले. ग्रामपंचायत शिवणकाम प्रशिक्षणाचा समारोप प्रमाणपत्र वाटप करून करण्यात आला