*जागतिक महिला दिनानिमित्त आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण*
*जागतिक महिला दिनानिमित्त आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण*
सिन्नर
नगर परिषद महिला व बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन उन्नती शहर स्तरीय संघ व महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्विसेस यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मुख्याधिकारी रितेश बैरागी यांचे मार्गदर्शनाखाली वित्तीय साक्षरता व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम सिन्नर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका प्रतिभा नरोटे, सुजाता भगत यांचे प्रमुख हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना बँक व्यवहार ऑनलाइन व्यवहार बाबत सर्वांनी अधिक जागरूक असने ही काळाची गरज असल्याने याबाबत प्रशिक्षण आयोजित केले असल्याचे प्रास्ताविकपर बोलताना शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी सांगितले. महिंद्रा फायनान्स सर्व्हिसेसचे रवींद्र अरवल,शुभकीर्ती अहिरे, पल्लवी निकम, ज्योती लांडगे यांनी डिजिटल प्रशिक्षणाचे महत्व समजावून सांगितले तसेच ऑनलाईन व्यवहार करताना कोणकोणते नियम पाळावेत, तसेच कोणकोणते धोके उद्भवू शकतात याबाबत महिलांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आभा कार्ड व डिजि लॉकर करिता यावेळी 624 महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली असून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 150 महिलांना आभा कार्ड व डीजी लॉकर उपलब्ध करून देण्यात आले. उर्वरित सर्व महिलांना आभा कार्ड व डीजी लॉकर काढून देऊन देण्यात येणार आहे. यावेळी मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक सीमा नसिरखान, द्वितीय क्रमांक नीलम शर्मा, तृतीय क्रमांक आरशा तांबोळी, उत्तेजनार्थ अक्षदा जारे, संगीता देशमुख, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती हांडगे, द्वितीय क्रमांक नीता जाधव, तृतीय क्रमांक ऋतुजा देशमुख उत्तेजनार्थ वंदना जाधव, निशा कापुरे, सुनीता पाबळे यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ, कर अधिकारी योगेश मुळे, कार्यालय अधीक्षक कैलास चव्हाण, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, नगर अभियंता सौरभ गायकवाड, शामल बोराडे, लेखापाल सुरेंद्रनाथ बारी, राहुल मुंगसे, श्रद्धा आव्हाड, संगणक अभियंता अभितोष सांगळे, पाणी पुरवठा अभियंता प्रशांत मेश्राम, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, कर निरीक्षक सौफिया बागल,विद्या सोनवणे, सोनाली लोणारे, यांचेसह उन्नती शहर स्तरीय संघाच्या अध्यक्ष निलोफर सय्यद, सचिव योगिता लोंढे सीआरपी प्रीती लोंढे, प्रतिभा भाटजीरे, रोहिणी सोनवणे, वैशाली वाघ, अश्विनी आंधळे, माया गोळेसर, शुभांगी उकाडे, माया गोळेसर, लता सोनवणे, पूजा जाधव, वंदना जाधव,रेखा शिंदे, आशा सदगीर यांचे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.