स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सवाचे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे व गिरीष महाजन यांना निमंत्रण; वेरूळ येथे साजरा होणार जयंती उत्सव
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सवाचे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे व गिरीष महाजन यांना निमंत्रण;
वेरूळ येथे साजरा होणार जयंती उत्सव
नाशिक : प्रतिनिधी
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची ४३१ जयंती मंगळवारी १८ मार्च २०२५ दुपारी ४ वाजता स्वराज संकल्पक शहाजीराजे स्मारक वेरूळ, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर येथे साजरी करण्यात येणार आहे.
Advertisementया जयंती महोत्सवाची सुरूवात २००३ पासून करण्यात आली. या वर्षी हे २२ वे वर्षे आहे. स्मारक सल्लागार समितीचे पदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्हाचे असून स्मारक नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घघाटक एकनाथ शिंदे यांना मुबई येथील मुक्तागीरी बंगला, शिक्षण मंत्री दादा भुसे, जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निमंत्रण देण्यात आले. यावेळी माजी खा हेमंत गोडसे, आमदार सिमा हिरे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, संपत जगताप आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुळ गाव वेरूळ असून तेथे पुर्वजांची गढी आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचा जन्म झाला, त्या सुवर्ण क्षणाचे स्मरण आणि जतन करण्यासाठी
स्मारक सल्लागार समिती महाराष्ट्र शासन, तथा संस्थापक स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सव समिती वेरूळ येथे गेल्या 22 वर्षांपासून साजरा करण्यात येतो.