गणेश गिते यांचा प्रभाग क्रमांक २०, २१ मध्ये झंझावाती प्रचार दौरा नाशिकरोडहुन आघाडी देण्याचा मतदारांचा निर्धार
गणेश गिते यांचा प्रभाग क्रमांक २०, २१ मध्ये झंझावाती प्रचार दौरा
नाशिकरोडहुन आघाडी देण्याचा मतदारांचा निर्धार
नाशिक : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश (भाऊ) बबन गिते यांनी १३ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड येथे प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, जोश आणि विश्वास यामुळे गणेश (भाऊ) बबन गिते यांना महाविकास आघाडीतर्फे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडून आणण्याचा निर्धार दिसून येत होता. युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
युवकांनी सांगितले गिते यांच्या प्रेमापोटी आम्ही सर्व ठिकाणी त्यांचा प्रचार करत आहे. आम्ही नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडून आणणार आहे असा निर्धार केला. प्रचारम्यान ठिकठिकाणी गिते यांच्यासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच ढोल ताशांच्या गजरात, मोठया पुष्पहारांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना मतदारांचा सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने ते विधानसभेवर निवडून जाणार असल्याचे चित्र आहे. या प्रचार दौऱ्यात गिते यांनी मतदारसंघातील विविध समाजघटकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यात प्रेस वर्कशॉप गेट, जिमखाना मैदान, शिखरेवाडी मैदान व शाळा क्र १२५ मैदान, प्रभाग क्रमांक २० मध्ये महाजन हॉस्पिटल, चंद्रमणी नगर, जिजामाता नगर, आरंभ कॉलेज, मलंग सोसायटी, रोझा कॉलनी, लोकमान्य नगर, गंधर्व नगरी, आकार सोसायटी, भारत पुजारी ऑफिस, अमर हौसिंग सोसायटी, स्वामी समर्थ मंदिर, शिखरेवाडी कारंजा, अजिंठा नगरी, बालाजी मंदिर, दत्त मंदिर चौक, गायखे कॉलनी, तरन तलाव, के जे मेहता शाळा , डावखरवाडी, धूम्र वर्ण गणेश मंदिर, कदम डेअरी, सुमन हॉस्पिटल, प्रधान नगर, म्हसोबा मंदिर, चेतन नगर, उपनगर सिग्नल, अशारी इस्टेट, उपनगर पोलीस स्टेशन, ख्रिश्चन कॉलनी, शिखरेवाडी ग्राउंड गेट, बिर्ला शाळा, शाहूनगर, अटल संकुल, रामनगर, भीम नगर, कैलास जी, श्री कलानगर, कलानगर, झुलेलाल मंदिर या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेतल्या.
यानंतर, प्रभाग क्रमांक २१ दौऱ्यात मुल्ला वाडा, लिंगायत कॉलनी, रजा चौक, गाडेकर मळा, कपालेश्वर चौक, साहेबा सलून, सुवर्ण सोसायटी, प्रशांत भाऊ जाधव ऑफिस, सुंदर नगर मार्ग, रोकडोबा वाडी, म्हसोबा मंदिर, ओटे मळा, भालेराव मळा, जाचक मळा, जय भवानी मंदिर, माणिक नगर, कदम लॉन्स, शिवाजी महाराज पुतळा, जगताप मळा, आनंद नगर, १२५ ग्राउंड मुक्तिधाम मार्ग, उगले मार्क्स, गोसावी वाडी मार्ग, राम रहीम चौक, सुभाष रोड, सुनील वाघ चौक, डॉ. बाबासाहेब आंबडेकर येथून देवी चौक मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
चौकट
तुमच्या पाठिंब्याच्या बळावर, नाशिकच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. स्थायी समिती सभापती असताना शहरात मोठा विकास करता आला. त्याही पेक्षा जास्त विकास तुम्ही करण्यासाठी मी कटिबध्द आहे.
गणेश (भाऊ) बबन गिते
उमेदवार, महाविकास आघाडी