नाशिक पूर्वमध्ये गणेश गीते यांना वाढता पाठिंबा; सर्व समाज धुरीणांचे निवडून देण्याचे आवाहन
नाशिक पूर्वमध्ये गणेश गीते यांना वाढता पाठिंबा;
सर्व समाज धुरीणांचे निवडून देण्याचे आवाहन
नाशिक प्रतिनिधी
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचा प्रचार शिगेला पोहचला असून आता खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि महा परिवर्तन शक्ती अशी तिरंगी लढत होण्याचे चित्र रंगवले जात असले तरी खऱ्या अर्थाने या मतदार संघात महाविकास आघाडीला मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता ही निवडणूक एकाच बाजूला झुकल्याचे दिसते.
या मतदार संघावर प्रामुख्याने मराठा समाजाचे वर्चस्व असून त्याखालोखाल, मागास वर्गीय, वंजारा, गुजराथी पटेल अशी मतदारांची लोकसंख्या आहे. बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचे दोन उमेदवार या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणेश गीते यांच्या समोर आहेत. मराठा समाजाचे नेते मात्र महाविकास आघाडीचे गणेश गीते यांच्या प्रचारात हिरीरीने सहभागी होताना दिसत असल्याने त्यांचे पारडे आज जड झाल्याचे जाणकार सांगतात.
दुसऱ्या बाजूला महायुती आणि महा परिवर्तन शक्तीत सक्रिय असलेले मराठा, वंजारा, एस सी, आदिवासी प्रवर्गातील नेते आणि कार्यकर्ते देखील कुणी उघड, कुणी अंतस्थपणे गणेश गीते यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र संपूर्ण मतदार संघात दिसत आहे. एकूणच महाविकास आघाडीसाठी या मतदार संघात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे दिसत असल्याने गणेश गीते यांचा विजय समीप आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
कोट :-
” शरद चंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्रात झेप घेत आहे. महायुतीला राज्य सरकारमधून पाय उतार करण्याची वेळ समीप आली असून शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे कर्तव्य आपण पार पाडावे.”
ऍड शिवाजी सहाणे, जय भवानी रोड, नाशिक रोड
………..
“महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे राजकारण नितिशून्य तर झालेच, मात्र समाज जीवन देखील अस्वस्थ झाले आहे राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात असल्याने औद्योगिक वसाहती ओस पडल्या, नवीन उद्योग येत नाहीत त्यातून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महागाईचा भस्मासूर बोकाळला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यातच वेगवेगळ्या लाडक्या योजनांचा मारा करुन राज्याची तिजोरी रिकामी केली आहे. राज्याला सावरण्यासाठी महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर आणणे हेच आपले मुख्य उद्दिष्ठ आहे.”
-संतोष गायधनी, नाशिकरोड