क्राईम

एसटीच्या ताफ्यात ‘ई-शिवाई ‘दाखल;  प्रवाशांना मिळणार अत्यानुदिक सुविधा व जादा गाड्या; ई-शिवाईमधून नाशिक आगार मालामाल; नाशिक-पुणे मार्गावर सर्वाधिक पसंती


एसटीच्या ताफ्यात ‘ई-शिवाई ‘दाखल;

 प्रवाशांना मिळणार अत्यानुदिक सुविधा व जादा गाड्या;

 

ई-शिवाईमधून नाशिक आगार मालामाल;

 

नाशिक-पुणे मार्गावर सर्वाधिक पसंती

 

 

 

नाशिक /किरण घायदार

 

राज्य परिवहन महामंडळ सध्या वाहनखरेदीवर भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या आणखी १०० ई-शिवाई गाड्या दाखल होणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, नाशिक विभागात तब्बल 20 E शिवाई बसेसचे आगमन झाले आहे.

या बसेस नाशिक_पुणे या मार्गांवर सध्या सुरु आहेत.

 

सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसनक्षमता अधिक आहे. त्यामुळे सणासुदीत प्रवाशांना आणखी बस मिळणार आहेत.

एसटीने ५,१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३८ मिडी ई-बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई- शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात १७ नव्या बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई- शिवनेरीची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

नागपूर-चंद्रपूर या मार्गावर, त्यानंतर नाशिक-बोरीवली तसेच नाशिक- छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीटदर सध्या चलनात असलेल्या ई-शिवाई बसेसप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.

राज्यात १३७ बस दाखल

राज्याच्या विविध भागात आतापर्यंत १३७ ई- बस दाखल झालेल्या आहेत. १३७ पैकी ३८ शिवाई ई-बस छत्रपती संभाजीनगर विभागातील सिडको विभागाला मिळालेल्या आहेत. उर्वरित बस राज्यभरात विविध ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. अनेक विभागातील ई-चार्जिंग हब आगामी आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.

 

राज्य शासनाच्या परिवहन विभागच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई- बसमध्ये हायटेक सुविधा असल्या तरी त्याचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाहीत. जालन्यासाठी १३०, बीडसाठी ३०० रुपये, पैठणला १३० रुपये असा दर आहे. तर लालपरीत हेच दर अनुक्रमे ९० व २०० असे आहेत. इच्छा असूनही सामान्यांना या बसमधून प्रवास करणे शक्य होत नसल्याने ते साध्या बसमधून प्रवास करत आहेत. ई बसची दरवाढ कमी केल्यास यातून आरामदायक प्रवास शक्य आहे.

Advertisement

 

ई-शिवाईमधून नाशिक आगार मालामाल;

 

नाशिक-पुणे मार्गावर सर्वाधिक पसंती

 

 

E शिवाई या इलेक्ट्रॉनिक बसच्या माध्यमातून नाशिक आगाराला 8 कोटींचा फायदा झाला आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या मर्यादित ई- शिवाई वसेस वाढविणे, जुन्या झालेल्या साध्या बसेसच्या जागेवर या बसेस आणणे, त्यांची नियमित देखभाल, दुरुस्ती करणे हे प्रमुख आव्हान महामंडळासमोर आहेत.

सात वर्षांपूर्वी शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली, त्यानंतर राज्यात दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला.

राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार एसटीने गेल्यावर्षी दि. १ जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण केले. संपूर्ण राज्यात पहिल्या टप्प्यात १५० ‘शिवाई’ बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या गेल्या. या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून नाशिक आगारात टप्प्या टप्प्याने २५ शिवाई बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी नाशिक-पुणे मार्गावर सर्वाधिक १० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ई-बस प्रदूषण विरहित,

 

अशी आहेत वैशिष्ट्ये

 

प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाची विजेवर चालणारी वातानुकूलिक शिवाई रस्त्यावर धावताना आवाज नसल्याने ध्वनिप्रद्यण नाही. अपंगांसाठी वेगळा रंप आहे. जीपीएस यंत्रणा कार्यान्वित, आपत्कालीन सूचनेसाठी बटनांची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा यासह अन्य सुविधा आहेत. बस एकदा चार्ज केल्यानंतर २५० कि.मी. पर्यंत धावू शकते.

 

 

नाशिक पुणे १८ फेऱ्या : 

 

अंतर : २१३ किमी एकूण फेऱ्या : ४ हजार ८१८ एकूण किमी : १० लाख २५ हजार २७० उत्पन्न: ५ कोटी ९४ लाख ४६ हजार ३०७

 

_पर्यावरणपूरक, वातानुकूलित व आवाज विरहित आहेत. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. या बसची लांबी १२ मीटर असून टूबाय टू आसन व्यवस्था आहे. यामध्ये एकूण ४३ आसने आहे. ध्वनी व प्रदूषणविरहीत तसेच वातानुकूलित गाडी तसेच गाडी

ताशी ८० किमी वेगाने ही गाडी रस्त्यांवर धावणार आहे. या बसची बॅटरी क्षमता ३२२ के. व्ही. आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *