महाराष्ट्र धर्म वाढवावा!!
महाराष्ट्र धर्म वाढवावा!!
कुबेर जाधव
आपली दुनियादारी विशेष
मंदिरं आमच्या इथेही पाडली. मंदिराचे कळस आमच्या इथेही उद्ध्वस्त केले. त्या जागी मिनार आमच्या इथेही उभे राहिले .पण,आम्ही राजा शिव छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे मावळे,आमचं आमचंपण आम्ही आमच्या जिर्णोद्धारावर,स्वबळावर,ताकदीनंउभं केलं .अवशेषांच्या पायाजवळ रडत बसणारी इथली औलाद आमची नव्हती . इतरांच्या प्रांतात एखाद् दोन जाती लढतात हा त्यांचा दुबळेपणा.महाराष्ट्रात मराठ्यावरचा वार न्हाव्याचं पोरगं अंगावर झेलतं .कायस्थांचा मुरारबाजी मरणाचा थरार उभा करतो .शिंदे-होळकरांची निशाणं उत्तरेतल्या घाटांना,कळसांना तग धरण्याची हमी द्यायची.
पाच पाच इस्लामी पातशाह्या आमच्या छाताडावर नाचल्या .पोर्तुगीज,वलंदेज , टोपीकर सारं सारं धुडकावून लाऊन मोहटादेवीपासून शांतादुर्गे पर्यंत आम्ही राखलं .घृष्णेश्वर , भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर साल्हेर मुल्हेर,सारं सारं जपलं …डाव टाकले प्रतिडाव केले.बुद्धीभेद केला.शह दिला.देव लपवले .बुतशिकन आणि कुफ्रशिकन म्हणवलेल्यांना भूल देऊन दिशाभूल केली.वेळ प्रसंगी भवानी सारख्या देवतेला बत्तीस दातांच्या बोकडांचा बळी दिला.
आम्ही आमचं राखलं … दुसऱ्याच्या मनगटाची रग दाखवून जग जिंकायची भाषा इथली मराठा लेकरं करत नाहीत .आमच्या छातीतली धग आमचं जग राखायला पुरेशी आहे*
आम्ही आमचं राखतो, कारण धर्मा साठी माणसं पणाला लावायची आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही .आमच्या मातीने माणसं जगवली ,उभी केली,झुंजती केली आमचा धर्म जिवंत आणि ज्वलंत राहिला तो त्या मुळं .
देवाच्या नावावर राजकारण नसत करायचं . राजकारण करून धर्म राखायचा असतोय, आम्ही तो राखला, आता आपलं ध्येय फक्त मराठा आरक्षण आहे हे डोळ्यासमोर ठेवून थंडी वाऱ्याची तमा न बाळगता मिळेल त्या वाहनाने ,पायी चालत घरादारावर तुळशी पत्र ठेवून तो निघाला मुंबईच्या दिशेने, गेल्या चार महिन्यांपासून घराचं दार न पाहिलेल्या जरांगे पाटील निघालाय मुंबईकडे समाजातील गोरगरीब जनतेला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी, मराठ्यांनो मराठ्यांसारखे वागा, छत्रपती शिवाजी राजांचे वारसदार आपण,लक्ष भरकटु देउ नका, ध्येय आणि कर्तव्यावर ठाम असल पाहिजे,राम आपल्या ह्रदयात कायमच आहे तो कालही होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे, पण समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला लढा परत परत नाही उभा करता येणार, त्यासाठी योग्य वेळी योग्य भुमिका घेतली पाहिजे,गोल माल भुमिके मुळे समाजातील पांखडी नेत्यांनी समाजाला चक्रव्यूहात अडकून ठेवलं आहे,आज पर्यंत मराठा नेत्यांनी केलेली चुक समाज म्हणून आपण करू नका, भानावर या, हीच योग्य वेळ आहे ध्येय साध्य करण्यासाठी, कुठलाही स्वार्थ अंगी न बाळगता निस्वार्थी भावनेने फक्त मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सरसावलेल्या समाज धुंरीधर जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहुन त्याला साथ देऊ या, यातच आपलं हित आहे,काल जरांगे पाटलांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील बाराबाबळी येथिल मदरशांवर अक्षरशः भगवे झेंडे फडकत होते, एखाद्या मदरशांवर पहिल्यांदाच भगवे झेंडे पाहायला मिळाले, त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम समाजाच्या भाइचारा नजरेत कायमचा लक्षात राहील, मुस्लिम बांधव मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे सरसावला आहे, मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा एकजूटीने पांटींबा देइल असे शेकडो मुस्लिम बांधवासमोर बोलताना जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
– समन्वयक
स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक
मो नंबर ्९४२३०७२१०२