क्राईम

आमदाराच्या ताफ्यातील वाहनाने उडविले: अविनाश शिंदे यांनी मात्र दवाखान्यात नेले


आमदाराच्या ताफ्यातील वाहनाने उडविले:

अविनाश शिंदे यांनी मात्र दवाखान्यात नेले

 

 

 

 

नाशिक- प्रतिनिधी

देवळाली विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या तिकिटावर अजित पवार गटातर्फे निवडणूक लढविणाऱ्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने 70 वर्षीय वृद्ध महिलेला धडक दिल्यानंतर ती वृद्धा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली असतानासुद्धा तिला वाऱ्यावर सोडून दिले.मात्र वंचित बहुजन आघाडीचे याच मतदारसंघातील उमेदवार डॉ.अविनाश शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याच्य पदाधिकाऱ्यानी तडीने पावले उचलून सदर वृद्ध महिलेस नाशिकरोडच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिचे प्राण वाचविले.याबद्दल शिंदे ज्यांना माहिती मिळताच,त्यांनी आपला प्रचार दौरा अर्धवट सोडून सदरील महिलेस बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले व परिवारास बिलासाठी काही पैसे पाहिजेत असेल काही मदत पाहिजे असेल तर विचारपूस करून महिलेच्या आशीर्वाद घेतले. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच शिंदे यांचे  सर्व थरातून कौतुक होत आहे.तर सरोज अहिरे यांनी माणुसकी न दाखविल्याने त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

Advertisement

गौराबाई हनुमंत साळुंखे(वय वर्षे 70) असे या जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. रस्त्याने जात असताना तिला सरोदे यांच्या ताफ्यातील वाहनाची( क्रमांक एम एच 15 HQ 9161) धडक बसली आणि ती रस्त्यावर जखमी अवस्थेत कोसळली. मात्र चालक आणि आमदार सरोज अहिरे यांना थोडीही दया आली नाही. प्रचाराच्या धुंदीत मग्न असलेल्या या लोकांनी माणुसकीला तिलांजली दिली आणि सर्व वाहने पुढे निघून गेली. सदर महिला जखमी अवस्थेत कन्हत असल्याचे कळताच बहुजन वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे उमेदवार शिंदे यांनी आपला प्रचार दौऱ्यातून वेळ काढून घटनास्थळी धाव घेतली आणि सदर वृद्धेची आपुलकीने विचारपूस करूनआपल्या वाहनातून नाशिकरोड येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले व तिच्या उपचाराचा सर्व भार उचलण्याची तयारी दर्शवून माणुसकी शिल्लक आहे हे निदर्शनास आणून दिले.आमदार स्वतः महिला आहेत.त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने धडक दिल्यानंतर आपला प्रचार दौरा थांबवून त्यांनी जखमी वृद्धेची किमान विचारपूस तरी करणे गरजेचे होते. परंतु तसे न करता सदर महिलेस जखमी अवस्थेत सोडून त्यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तर अविनाश शिंदे यांच्याबद्दल कौतुकोदगार काढतांना लोक दिसत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *