क्राईम

जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्न सेवा समितीला रुग्ण भोजन सेवेला मज्जाव; शासन निर्णयामुळे रुग्णालय प्रशासनाचा निर्णय ; अन्न सेवा समितीची नाराजी 


जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्न सेवा समितीला रुग्ण भोजन सेवेला मज्जाव;

शासन निर्णयामुळे रुग्णालय प्रशासनाचा निर्णय ; अन्न सेवा समितीची नाराजी 

 

 

 

 

 

नाशिक प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातूनही येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांना काही सेवाभावी संस्थांकडून भोजन उपलब्ध करून दिले जाते. मात्र यापुढे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अन्नदान करण्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी मनाई केली आहे. या आदेशाबाबत अन्नदान करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्र्यंबक रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात नाशिक जिल्ह्यासह लगतच्या पालघर, ठाणे, डहाणू, जळगाव, मध्य प्रदेश, धुळे व संगमनेर, अकोले या आदिवासी तालुके- पाड्यांवरून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या रुग्णांसोबत नातलगही येतात. रुग्णालयात बहुतांशी दाखल असलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या आहार विभागाकडून दोन वेळचे जेवण, नाश्ता दिला जातो. परंतु त्याचवेळी रुग्णांच्या नातलगांच्या जेवणाची व्यवस्था नसते. तर, त्यांना बाहेरील हॉटेलमधील जेवण घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते.

Advertisement

 

त्यामुळे, रुग्णांच्या नातलगांना दोन वेळच्या जेवणासाठी भटकंती करावी लागू नये या उद्देशाने शहरातील काही सेवाभावी संस्थांसह अन्न सेवा समितीने रुग्णांसह त्यांच्या नातलगांना नाश्ता व जेवणाची व्यवस्था गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अन्नदान करण्यास नकार दिला आहे. याबाबत सेवाभावी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

चौकट

 

“यापूर्वी अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार घडलेले आहेत. जिल्हा रुग्णालयात असे घडू नयेत, यासाठी शासन आदेशानुसार अन्नदानाच्या प्रकारास मनाई केली आहे. संबंधितांनी रुग्णालयाच्या आवाराबाहेर आपले उपक्रम राबवावेत.”- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

 

“जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातलग हे अत्यंत दुर्गम भागातील असतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्यासमोर जेवणाची समस्या असते. अशावेळी मानवतेच्या भावनेतून त्यांना अन्नदान करणे, वस्त्रदान केले जाते. अन्नही तपासूनच दिले जाते. मात्र त्यास मनाई करणे योग्य नाही.”- डॉ. जोगिंदर नंदा, अन्नसेवा समिती, नाशिक.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *