संगमनेर साहित्य परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर -अध्यक्षपदी अरविंद गाडेकर, कार्याध्यक्ष पदी किसन भाऊ हासे सचिव पदी ज्ञानेश्वर राक्षे
संगमनेर साहित्य परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर
-अध्यक्षपदी अरविंद गाडेकर, कार्याध्यक्ष पदी किसन हासे,सचिव पदी ज्ञानेश्वर राक्षे
रश्मी मारवाडी /संगमनेर
संगमनेर येथील साहित्य क्षेत्रात अग्रस्थानी असलेली संगमनेर साहित्य परिषद आपल्या उपक्रमशील कृतीतून साहित्य चळवळ अतिशय जोमाने पुढे नेत आहे. या परिषदेची दिनांक २० जानेवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी परिषदेच्या सदस्या पुष्पाताई निऱ्हाळी यांचे पती कै. अशोक निऱ्हाळी यांना आणि परिषदेचे दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी मागील काळात परिषदेने कोणकोणते उपक्रम राबविले त्याचे वाचन केले. परिषदेचा जमा-खर्च सदस्यांसमोर सादर केले. यावेळी गाडेकर म्हणाले, ” परिषदेने अत्यंत काटकसरीने बचत करून परिषदेकडील शिल्लक निधीत वाढ केली आहे, यावेळी सर्व सभासदांनी मोलाचे योगदान दिले त्यामुळेच हे शक्य झाले आहे. परिषदेने वाचन मंडळाच्या माध्यमातून वाचन चळवळ सुरु ठेवली असून परिषदेचे पसायदान वाचनालय असून त्यात मोठी ग्रंथ साहित्य आहे , यात परिषदेचे सदस्य वाचनाचा लाभ घेत आहे. परिषदेचे सचिव दिलीप उदमले यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली या कार्यकारणीस उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली. नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे – अरविंद गाडेकर ( अध्यक्ष ) ,किसन हासे ( कार्याध्यक्ष ), दिलीप उदमले ( उपाध्यक्ष ) , लक्ष्मण ढोले (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर राक्षे ( सचिव ) , अनिल सोमणी ( सह- सचिव) , बाळकृष्ण महाजन ( सह- सचिव ) , गिरीश सोमाणी ( खजिनदार ) , मनोज साकी ( सह- खजिनदार ), मुकुंद डांगे ( वाचन मंडळ प्रमुख) , मंगला पाराशर ( वाचन मंडळ प्रमुख) , इद्रिस शेख (ग्रंथालय प्रमुख) , राजेंद्र वेल्हाळ ( ग्रंथालय प्रमुख ) , पुष्पाताई निऱ्हाळी ( ग्रंथालय प्रमुख ) , रामनाथ सातपुते ( प्रसिद्धी प्रमुख ) , विजय दीक्षित ( प्रसिद्धी प्रमुख ) , सुरेश परदेशी ( संघटक प्रमुख ) , महेश गोडसे ( सह- संघटक प्रमुख ) , ज्ञानेश्वर गोंटे ( सह- संघटक प्रमुख ) यावेळी नवीन कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारभारी देव्हारे , डॉ. जी.पी. शेख , उषाताई कपिले , विकास खेडकर ,शशांक गंधे, डॉ. सुधाकर पेटकर , नंदकिशोर बेल्हेकर , राजेंद्र वेल्हाळ , ललित देसाई , बाळकृष्ण महाजन , लक्ष्मण ढोले , संदीप सातपुते , प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे , शोभा काळे , मालती गोरडे , प्रा. रामचंद्र कमलाकर , सय्यद असिफ अली , जिजाबा हासे , श्रीधर घोडेकर , अनिल सोमणी , गणेश सराफ , प्रकाश कोटकर , विजय निऱ्हाळी , धर्मेंद्र अभंग , महेश गोडसे , मुकुंद डांगे , मनोज साकी , शेख इद्रिस , सुखदेव इल्हे , तनुष पठाडे , गिरीश सोमाणी , सोमनाथ मदने उपस्थित होते.
यावेळी किसन हासे , निलेश पर्बत , नितीन वाकचौरे, दीपक टाक यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन दिलीप उदमले यांनी केले , आभार ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले.