भारतीय जनता पार्टी प्रभाग ९ च्या वतीने महिला दिनानिमित्त पैठणी व विविध बक्षीस देत महिलांचा गुणगौरव; स्वतःमधले गुण आत्मसात करून आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी कार्य करावे – आ.सीमा हिरे
भारतीय जनता पार्टी प्रभाग ९ च्या वतीने महिला दिनानिमित्त पैठणी व विविध बक्षीस देत महिलांचा गुणगौरव;
स्वतःमधले गुण आत्मसात करून आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी कार्य करावे – आ.सीमा हिरे
नाशिक प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान व तनिष्क सकाळ समूहाच्या तर्फे महिलांसाठी मनोरंजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सीमा महेश हिरे,माजी महापौर दशरथ आप्पा पाटील,छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,भाजपा पदाधिकारी रश्मी हिरे,मंगला खोटरे,काजल मोरे, जान्हवी तांबे,तनिष्क सकाळ समूह नाशिक जिल्हा प्रमुख गौरी साबळे,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव,नवनाथ शिंदे,आकाश पवार,संजय तुपलोंढे,शंकर पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर,युवानेते प्रेम दशरथ पाटील व अर्चना संजय तुपलोंढे यांनी केले होते.
यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांचा तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील महिलांच्या विविध स्पर्धा घेऊन स्पर्धेतील विजेत्या महिलांना पैठणी साडी तसेच विविध आकर्षक भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तसेच सहभागी सर्व महिलांना महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या आकर्षक भेटवस्तू देत आयोजकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित महिला भगिनींना आमदार सीमा महेश हिरे, माजी महापौर दशरथ आप्पा पाटील,छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवानेते प्रेम दशरथ पाटील, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी पदाधिकारी रश्मीताई हिरे,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,खूप चांगला असा उपक्रम प्रभाग क्रमांक ९ मध्ये घेण्यात आला आहे.यामधून महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून एक दिवस आपल्यातील कला दाखविण्यासाठी संधी मिळाली असून,हा उपक्रम विशेष कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व माता-भगिनींसाठी आनंददायी उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.
कोट –
“आजच्या या युगात महिला ह्या केवळ चूल आणि मूल या चौकटीत न राहता सर्वच क्षेत्रांमध्ये प्रमुख भूमिका बजावत आहेत. आज प्रत्येक महिला तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठत आहे.या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा तसेच प्रभागातील महिलांना रोजच्या दैनंदिन आयुष्यातून एक विरंगुळा उपलब्ध व्हावा, हाच आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुढील काळात माझ्या माध्यमातून माझ्या प्रभागातील महिला बंधू-भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असणार आहे.”
– सविता करण गायकर
सामाजिक कार्यकर्त्या
प्रभाग क्रमांक 9
भारतीय जनता पार्टी