खड्ड्यात वृक्षारोपण आणि आरती , अगरबत्ती करून आंदोलन सिन्नर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाची गांधीगिरी शहराच्या प्रमुख रस्त्यावर झालेल्या खड्ड्यकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
खड्ड्यात वृक्षारोपण आणि आरती , अगरबत्ती करून आंदोलन
सिन्नर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाची गांधीगिरी
शहराच्या प्रमुख रस्त्यावर झालेल्या खड्ड्यकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सिन्नर प्रतिनिधी
शहरातील विविध भागांत व प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
हे खड्डे बुजविण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने येथील महात्मा फुले पुतळ्याजवळील खड्ड्यात वृक्षारोपण करून व अगरबत्ती फुले व आरती करून गांधीगीरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे तालुकाध्यक्ष ऍड.संजय सोनवणे व डॉ विष्णु अत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
संपुर्ण शहराला खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून खड्ड्यांचे शहर म्हणून सिन्नरची ओळख निर्माण झाली आहे.
शहरातील नागरिकांना सततच्या रिमझिम पावसामुळे खड्ड्यातुन रस्ता शोधुन मार्गक्रमण करणे अत्यंत कठीण बनले.
शहरातील नवापुल.बस स्ठॅंड.भैरवनाथ मंदीर.नाशिक वेस.देवी रोड.लालचौक. खडकपुरा.गंगावेस.सोनार गल्ली.मुंगे गल्ली.खडकपुरा.तानाजी चौक.पडकी वेस आदी प्रमुख रस्ते अक्षरशः चाळण झाली आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाचा विजय असो.अशा घोषणा देऊन गांधीगीरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी शहराध्यक्ष नामदेवराव कोतवाल.दत्ता गोळेसर.केशव सहाणे. प्रदेश सचीव रविंद्र काकड.दत्तु जोर्वे.खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब तांबे.डाॅ.सदाशिव लोणारे.दत्तु ढोन्नर.दत्तात्रय डोंगरे.सुकदेव सगर.ज्ञानदेव वाघ.ज्ञानेश्वर टिळेकर.शिवाजी सदगीर रविंद्र ऱोकडे के डब्लु सोनवणे आदी उपस्थित होते.

खड्ड्यात वृक्षारोपण आणि आरती , अगरबत्ती करून आंदोलन

