संगमनेर मेडिकव्हर हॉस्पिटल येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात तालुक्यातील आजी माजी सैनिकांचा सत्कार मेजर खामकर यांना मिळाला ध्वजा रोहनाचा मान
संगमनेर मेडिकव्हर हॉस्पिटल येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात
तालुक्यातील आजी माजी सैनिकांचा सत्कार
मेजर खामकर यांना मिळाला ध्वजा रोहनाचा मान
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सालाबादा प्रमाणे देशाचा 78 वा स्वतंत्रता दिवस आजी-माजी सैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते.
उपस्थित सर्व आजी माजी सैनिकांचा मेडिकवर हॉस्पिटल च्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला. ह्यावेळी सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे संस्थापक भानुदास पोखरकर, सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर,अध्यक्ष प्रकाश कोटकर, अध्यक्ष सैनिक कल्याण समिती संदीप गुंजाळ, उपाध्यक्ष कॅप्टन सुभाष कुडेकर, कार्याध्यक्ष, सुनील थोरात, विजय खामकर, संजय रहाणे, संतोष पोखरकर ,कॅप्टन संजय अभंग,सूभेदार गिरीश एरंडे, लेफ्टन अनिल पावसे, कॅप्टन शेख साहेब, कॅप्टन घुले साहेब, दत्तू खुळे, सुभेदार मेजर गोकुळ मतकर, सुभेदार प्रकाश पवार, संजय आहेर, दिलीप आंब्रे, रघुनाथ पवार, संतोष जाधव, मधुकर नेहे, सुभाष धानापुणे वनविभागाचे अधिकारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने मुख्य व्यवस्थापक यादव ,चौधरी ,,संतोष गोडसे व सर्व मेडिकल स्टाफ उपस्थित होता.
यावेळी स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोटकर यांनी प्रत्येक जण सीमेवर जाऊन लढू शकत नसला तरी आपापल्या क्षेत्रांमध्ये देशासाठी समर्पणाची भावना ठेवून प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.