ताज्या घडामोडीसामाजिक

जगाला ‘जिओ और जिने दो’ चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती इगतपुरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


जगाला ‘जिओ और जिने दो’ चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती इगतपुरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

 

इगतपुरी प्रतिनिधी –

शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीतून जैनबांधवांनी सामाजिक एकोपा, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा, बेटी बचाव, शाकाहार याबाबत जनजागृती केली. समाजजागृतीचे दर्शन घडवीत, पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक खालची पेठ, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सेंट्रल पॉइंट, तीन लकडी, नवा बाजार मार्गे जैन स्थानक येथे पोहचली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांना पिण्याच्या पाण्याची, सरबत आदी पेयांची व्यवस्था करण्यात आली तसेच जैन स्थानक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करून भगवान महावीरांचे दर्शन घेत भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला.

Advertisement

आयोजकांच्या वतीने या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जैन बांधव व महिला यांनी शिस्तबध्दता, पारंपारीक वस्त्र, महावीरांचे विचार प्रचार व विविध सामाजिक, धार्मिक विधीवत कार्यक्रम सादर केली. यावेळी सुशील बहु मंडळ, आनंद पाठशाळेचे बाल कलाकार यांनी भगवान महाविरांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या घटना अभिनयातुन सादर केल्या. या प्रसंगी मिरवणुकीत संघपती सुभाष लुणावत, प्रकाश टाटीया, अजित पारख, पोपट लुणावत, पुरणचंद लुणावत, सुरेश चोपडा, कुणाल लुणावत, महेश श्रीश्रीमाळ, अजित लुनावत, ज्येष्ठ नागरिक संघाचे आर. जी. परदेशी, राजु छाजेड, अजय लुणावत, श्याम चांडक, सिध्दांत पारख, योगेश चांडक, राजेश मेहता, पवन छाजेड, सचिन बाफना, अजित बाफना, रमेश समदडिया, महेंद्र लूणावत, अभय लुणावत, डॉ नरेंद्र सेठी, यांच्यासह वैशाली बाफना, नयना पारख, अनिता बाफना, अनिता छाजेड, विजया टाटिया, सपना चोपडा, कविता लुणावत, सुनिता छाजेड, मिना छाजेड, सपना टाटीया, रेश्मा समदडीया, आशा लुणावत, मनिषा बाठिया, तृप्ती चोरडीया यांच्यासह शहर व परिसरातील जैन बांधव, महिला, मुली, मुले यांच्यासह जेष्ठांनी ही या उत्साहात सहभाग घेतला. या मिरवणुकीची सांगता वरची पेठ येथील जैन भवनात झाली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *