अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने नाशिकमध्ये १० ऑगस्टला दोन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन; कृषी, उद्योग, रोजगार, पर्यटन, शिक्षण, आरक्षण, महिला, युवक भवितव्य संधीवर होणार मंथन
अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने नाशिकमध्ये १० ऑगस्टला दोन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन;
कृषी, उद्योग, रोजगार, पर्यटन, शिक्षण, आरक्षण, महिला, युवक भवितव्य संधीवर होणार मंथन
नाशिक प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक येथे शनिवार 10 ऑगस्ट व रविवार 11 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन केले आहे
या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित केले आहे या अधिवेशनात पूर्वसंध्येला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित केली आहे
या परिषदेत “नाशिक आजचे उद्याचे आणि मराठा समाज” असा विषय ठेवला असून त्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण व महिला व युवकांचे भवितव्य संधी अशी दोन चर्चा सत्र आयोजित केलेले आहेत अधिवेशनाच्या समारोह विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून समारोप करण्यात येणार आहे
राजेंद्र कोंढरे अध्यक्ष प्रमोद जाधव कोषाध्यक्ष उ.म.स़पर्कप्रमुख-नानासाहेब बच्छाव मा.चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष मा.व्यंकटेश मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके अशोक कदम स्वाती जाधव शोभाताई सोनवणे एडवोकेट स्वप्ना राऊत संजय पडोळ दीपक पाटील राजेभाऊ जाधव राम निकम संदीप बह्रे रोहिणी उखाणे एडवोकेट स्वप्ना राऊत सुवर्णा पाटील अनिता ढेमसे एडवोकेट शैलजा चव्हाण रूपाली सोनवणे वंदना कदम आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.