ताज्या घडामोडी

गीता ज्ञान – पुण्यवान व्यक्ती फळ


गीता ज्ञान – पुण्यवान व्यक्ती फळ

आपल्या घरामध्ये, संघटनांमध्ये कोणीतरी एक पुण्यवान व्यक्ती असेपर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

रामायणामध्ये एक दृष्टांत येतो, जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होता.

तोपर्यंत रावनाने पाप केले तरी विभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता.

रावणाने जेंव्हा विभीषण सारख्या राम भक्ताला लाथ मारून लंके मधून निघून जाण्यास सांगितले.

तेव्हापासून रावणाचा विनाश व्हायला सुरुवात झाली.

एक वेळ अशी आली की संपूर्ण लंकेचे दहन झाले.

रावणाच्या मृत्यूनंतर मागे रडायला देखील कुणीही वाचले नाही.

अशाच प्रकारे महाभारतामध्ये देखील एक दृष्टांत येतो.

जोपर्यंत हस्तीनापुर नगरीमध्ये विदुरजी सारखा भक्त रहात होता.

तोपर्यंत कौरवांना सुखच- सुख मिळाले.

परंतु जेंव्हा कौरवांनी विदुरर्जींचा अपमान करून त्यांना राज्यसभेतून जाण्यास सांगितले.

त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी विदुरजींना सांगितले की काका आपण तीर्थयात्रेला निघून जावे. जसे विदुरजींनी हस्तीनापुर सोडले.

कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली.

Advertisement

त्यांचे राज्य गेले, त्यांचा मागे कोणीही वारस राहिला नाही.

आपल्या कुटुंब मध्ये, मित्र परिवारामध्ये जोपर्यंत कोणी भक्त व पुण्यवान व्यक्ती असेल.

तोपर्यंत त्या घरामध्ये आनंदी- आनंद असतो.

इथे विचार करण्याची गोष्ट ही आहे की, एखाद्याच्या फक्त सहवासाने आपल्या घरामधील पीडा निघून जाते.

आणि आपणाला चांगले दिवस येऊ लागतात.

परंतु अशाच व्यक्तींचा जर कोणी उपहास केला तर ती व्यक्ती जेंव्हा तुमचा त्याग करिते . तेव्हापासून तुमच्या ओहटीला सुरुवात होते.

म्हणून भगवंताच्या भक्ताचा व चांगल्या व्यक्तींचा कधीही अपमान करू नका.

जे तुम्ही कमावून खात आहात ते कुणाच्यातरी पुण्याईचे फळ असते.

जो भक्ती करीत असेल त्याचा कधीही अपमान करू नका.

त्याचा नेहमी सन्मान करा. त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. आपणाला हे माहीत नाही की आपल्या संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईमुळे चालत आहे.

आई-वडील, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा.

आपण सोबत काहीही घेऊन आलो नाही.

या संसाराला अलविदा करू तेव्हा या संसारातून काहीही घेऊन जाणार नाही.

हे कायम लक्षात ठेवा…!!

म्हणून स्वतः आनंदाने जगा..!

व दुसऱ्यांना देखील आनंदाने जगू द्या…!!

*शेख युनुस अहमदनगर प्रतिनिधी*..✍️


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *