ठाणगाव येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा; आदिवासी पेहरावात मुलामुलींचे डीजेवर नृत्य
ठाणगाव येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा;
आदिवासी पेहरावात मुलामुलींचे डीजेवर नृत्यAdvertisement
सिन्नर प्रतिनिधी
ठाणगाव येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हिंदू महादेव कोळी मित्र मंडळ ठाणगाव व भालेवाडी काळेवाडी रताळवाडी, मित्र मंडळांकडून गावातून मिरवणूक काढण्यात आली.आदिवासी मुलींनी व मुलांनी आदिवासी पेहराव करून डीजेच्या तालावर नृत्य सादर केले.यावेळी क्रांतिकारी बिरसा मुंडा , छत्रपती शिवाजी महाराज, राघोजी भांगरे, महावीर डॉक्टर बाबासाहेब, आंबेडकर, राया ठाकर, उमाजी नाईक, यांच्या प्रतिमेचे पूजन जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, रामदास भोर, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक शिंदे, जनसेवीचे सदस्य शंकरा आमले, सामाजिक कार्यकर्ते भरत गुंड, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भीमा फोडसे , रामनाथ मेंगाळ, भाऊसाहेब कातोरे, सोमनाथ मेंगाळ,भाऊसाहेब गुंड, बाबुराव जाधव, किरण गांगड, प्रवीण भले, सुनील गांगड, सुनील गोसावी, भगवान जाधव, अनिल गोसावी, अरुण बेंडकुळे कृष्णा जाधव, नामदेव अस्वले, नारायण धोंगडे, भरत आघान, सोपान गुंड, शिवाजी गुंड, अनिल जाधव, मोठ्या संख्येने आदिवासी बांधव हजर होते.