हिवरगाव पावसा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी
हिवरगाव पावसा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी
(हिवरगाव पावसा ):-
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य पारंपारिक मिरवणूक व व्याख्यानाचे आयोजन भीमशक्ती तरुण मित्रमंडळाने केले होते.सायंकाळी ६ वा. भव्य मिरवणुकीने कार्यक्रमास सुरुवात झाली.सदर मिरवणुकीत तरुण,महिला,ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभगी झाले होते.त्यानंतर बुध्द विहार येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बहुजन प्रतिपालक छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्रिशरण व पंचशील सामूहिकरीत्या ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास हिरालाल पगाडाल सर प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. हिरालाल पगाडाल सर मार्गदर्शन करताना म्हणाले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौध्द समाजाचे नव्हते,मागासवर्गीय समाजाचे नेते नव्हते,ते सर्व बहुजन समाज,कष्टकरी कामगार,महिला,शेतकरी,अठरापगड जाती जमाती आणि सर्वच भारतीयाचे उद्धारकर्ते होते.बाबासाहेबांनी दामोदर नदीवरील प्रकल्प,हिराकुंड,सोनू नदीवरील धरणाच्या निर्मिती मध्ये मोठे योगादान आहे.या धरणांमुळे पूर नियंत्रण शक्य झाले,जलसिंचन,विद्युतनिर्मिती,पाणीपुरवठा उद्देश सफल झाला.सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे हि मागणी बाबासाहेबांनी केले होती.शेतकऱ्यांचा शेती माल परदेशातही रुपया विकला गेले पाहिजे असे सांगितले होते. बाबासाहेबांमुळे महिलांना वडिलांच्या संपत्ती मध्ये हक्क मिळाला.पोटगीचा अधिकार मिळाला.देशातील सर्व जनतेला एक मताचा अधिकार मिळाला ही बाबासाहेबांची देण आहे.
अध्यक्षीय भाषणात राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे म्हणाले, बाबासाहेबांनी शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा सांगितले पण बहुजन समाजाने संघटीत व्हा,संघर्ष करा एवढेच स्वीकारले.आज सर्वच समाजाने उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलांना सहकार्य केले पाहिजे.बहुजन समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेतले तरच स्पर्धेच्या युगात प्रगती करू शकतात.शिक्षणामुळे घराची,समाजाची,देशाची प्रगती होणार आहे.
या कार्याक्रमास सरपंच सुभाष गडाख,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,साप्ताहिक कृषीसाधनाचे संपादक यादवराव पावसे,वृक्ष मित्र प्रा.गणपत सर,वि.वि.का.सेवा सोसायटीचे संचालक अशोक भालेराव, सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,शिवसेना तालुका समन्वयक भीमाशंकर पावसे,ग्रामपंचायत सदस्य दिनकर भालेराव,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,माजी पोलीस निरीक्षक नारायण पावसे, युवा कार्यकर्ते रंजनदादा शिंदे,यांच्या सह बाल संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला,बौद्ध बांधव तसेच ग्रामस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीनचंद्र भालेराव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक भालेराव, मन्सूर इनामदार, बाळासाहेब भालेराव,विशाल भालेराव, बच्चन भालेराव,सागर भालेराव,लहानू भालेराव,यादव भालेराव,चंद्रकांत भालेराव,महेंद्र भालेराव,प्रशांत वाकचौरे, सागर भालेराव,राहुल भालेराव,संजय भालेराव, राजेंद्र भालेराव,शरद भालेराव,मुकेश भालेराव, राजेंद्र रामभाऊ भालेराव, उत्तम गायकवाड,प्रल्हाद मोकळ, प्रवीण गडाख, सुयोग भालेराव,संतोष भालेराव, मिलिंद भालेराव, राहुल रवींद्र भालेराव, चंद्रकांत संसारे, भीमराज भालेराव, गौतम भालेराव, हर्षल भालेराव, रोहित भालेराव,उमेश भालेराव, चेतन भालेराव, विकास दारोळे, सतीश भालेराव, रवी दारोळे, रमेश दारोळे,राजेंद्र दारोळे, धनंजय वाघमारे, सुरज भालेराव, बाबाजी हनुमंत भालेराव यांच्या सह भीमशक्ती तरुण मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.